वडवणी । वार्ताहर
वडवणी तालुक्यातील मोरवड येथील अशोक विष्णू अंडील (17) पुजा विष्णू अंडील (15) वर्ष हे आपल्या शिवाशेत नावाच्या शेतामध्ये गेले असताना दुपारी तीनच्या सुमारास जोराचा पाऊस सुरू झाला. त्यावेळी वादळी वा-यासह विजेचा कडकडाट सुरू झाला गावापासून शेत दूर असल्याने शेतातील आंब्याच्या झाडाखाली आसरा घेतला असता साडेचारच्या सुमारास वीज कोसळून या दोन्ही बहिण-भावांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने मोरवड गावामध्ये शोककळा पसरली आहे. नुकतीच भाई गंगाभिषण थावरे यांनी भेट देऊन कुटुंबाचं सांत्वन केले.
मोरवड येथील शेतकरी विष्णूअंडील यांना अशोक विष्णू अंडील पुजा विष्णू अंडील अशी दोन अपत्ये होते. त्यांना बाहेगव्हाण शिवारात सहा एकर जमीन आहे मुलगा लातूर येथे अकरावी वर्गमध्ये शिक्षण घेत होता तर मुलगी गावातीलच शाळेत नववीमध्ये शिक्षण घेत होती. मुलगा लॉकडाऊन असल्याने लातूर येथून गेल्या महिन्यातच गावी परतला होता. मान्सून पाऊस पडल्याने शेतामध्ये मशागतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे दोघे बहिण-भाऊ शेतामध्ये कामानिमित्त गेले होते.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment