मुंबई । वार्ताहर

कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या, ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू होणार आहेत. शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मान्यता मिळाली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर काही ठिकाणी उपक्रम राबवला जाईल. शाळा सुरु होणार असल्या तरी त्या सरसकट होणार नाहीत त्यासाठी काही मार्गदर्शक तत्वही दिले गेले आहेत.

राज्यात जुलैपासून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यायी शिक्षण विभागाने तयारी दर्शवली होती. शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाली आहे.त्यानुसार आता शाळा सुरु करण्याबाबतचे संभाव्य स्वरुपाचे वेळापत्रक तयार केले जात आहे. स्थानिक परिस्थिती विचारत घेऊन त्याप्रमाणे शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार शाळा सुरू करण्यापूर्वी त्यांनी सॅनिटायझेशन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसवण्याची अट असणार आहे. शिक्षक, विद्यार्थ्यांना मास्क घालणे बंधनकारक केले गेले आहे.शाळा सुरू करण्यापूर्वी एक महिना सदर गावात कोरोनाच्या एकही रुग्ण नसेल याची खात्री करून शाळा सुरू कराव्यात. जिथे महिनाभरात एकही रुग्ण आढळला नाही तिथले नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलैपासून सुरू करण्याची तयारी केली जाईल. तसेचसहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून सुरू करण्याची तयारी होईल.टप्प्याटप्प्याने पहिली ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून सुरू होतील. अकरावीचे वर्ग दहावीचा निकाल लागल्यानंतर आधी प्रवेश प्रक्रिया होईल.ती पूर्ण झाल्यावर वर्ग सुरू करण्याची तयारी होईल. विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी एक दिवस आड वर्ग भरवण्याचीही मुभा मिळणार आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.