जिल्ह्यातील 93 रिपोर्ट निगेटिव्ह
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातून आज रविवारी (दि.14) सकाळी 136 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले यातील 93 रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले असून उर्वरित 43 रिपोर्ट आज रात्रीपर्यंत जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त होतील अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
तपासणीला पाठवलेल्या स्वॅबमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातून 49, बीड कोव्हीड केअर सेंटरमधून 23 असे एकुण 72 तसेच अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातून 18, कोव्हीड केअर सेंट अंबाजोगाईतून 11 केज उपजिल्हा रुग्णालय 1,आष्टी ग्रामीण रुग्णालय 2, गेवराई उपजिल्हा रुग्णालय 4 आणि परळी उपजिल्हा रुग्णालयातून 28 व्यक्तींच्या थ्रोट स्वॅबचा समावेश आहे. यातील 93 रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले असून उर्वरित 43 रिपोर्ट आज रात्रीपर्यंत प्राप्त होणार आहेत.
Leave a comment