मुंबई : बॉलिवूडमधील एक चांगला म्हणून ओळख असलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली आहे. वांद्र्यातील घरी गळफास घेऊन त्यांनं आत्महत्या केल्याची माहिती आहे. सुशांत हा नैराश्यात होता अशी माहिती मिळाली आहे.काही दिवसांपूर्वीच सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सुशांत सिंह राजपूतचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी झाला होता. सुशांतने 'किस देश में है मेरा दिल' मालिकेत पहिल्यांदा काम केलं. मात्र त्याला खरी ओळख एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून मिळाली. यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. काय पो छे हा सुशांतचा पहिला सिनेमा होता. पहिल्याच सिनेमातील अभिनयाबद्दल त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं होतं. 2013 सालच्या काय पोछे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून सुशांतने काही निवडक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या.
त्याच्या कारकिर्दीला खरा ब्रेक मिळाला तो धोनीवर केलेल्या बायोपिकमधील भूमिकेनंतर. त्यांनं एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी मध्ये महेंद्रसिंह धोनीची भूमिका केली होती.
सोबतच शुद्ध देसी रोमान्स, पी.के., डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी अशा सिनेमांमध्ये त्याने लक्षवेधी भूमिका निभावल्या होत्या.
सुशांत सिंह राजपूतने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली होती. पवित्र रिश्ता या सिरियलमुळे सुशांत सिंह घराघरात पोहोचला होता.
(सविस्तर वृत्त लवकरच)
Leave a comment