अंबाजोगाई । वार्ताहर

पाझर तलावालगतच्या जमिनीतील माती जेसीबीने नेणार्‍यांविरुध्द पोलीसात तक्रार अर्ज देणार्‍या वृध्द महिलेस दोघांनी अर्ज मागे घेण्यासाठी दमदाटी करत मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून महिलेने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली होती. गतवर्षी 15 ऑगस्टला घडलेल्या या घटनेप्रकरणी शुक्रवारी (दि.12)  दोघांविरुध्द बर्दापूर ठाण्यात आत्महत्येस कारणीभूत ठरले म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.

कुशाबाई नारायण बुरुजपट्टे (67, रा.नागझरी, ता.अंबाजोगाई) असे आत्महत्या केलेल्या वृध्देेचे नाव आहे. याबाबत चंद्रकात रामकिसन बुरुजपट्टे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कुशाबाई या त्यांच्याकडे राहत असताना पाझर तलावातील संपादित जमिनीलगतच्या शिल्लक जमिनीची माती विवेकानंद सुभाष लहाने (रा.नागझरी) व अनिल उर्फ अनुप बालाजी घुले (रा.येळंब,ता.परळी) या दोघांनी जेसीबीच्या सहाय्याने स्वत:च्या फायद्यासाठी नेली होती. याबाबत कुशाबाईंनी पोलीसात तक्रार अर्ज दिला होता. दरम्यान या दोघांनी अर्ज मागे घेण्यासाठी दमदाटी करत मानसिक त्रास दिला.  यामुळे कुशाबाईंनी विषारी द्रव प्राशन करुन जीवनयात्रा संपवली. अखेर न्यायालयातून आदेश प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारी दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला. उपनिरीक्षक जमादार तपास करत आहेत. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.