मुंबई : गेल्या 24 तासामध्ये राज्यात 3427 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 4 हजार 568 इतकी झाली आहे. दिलासादायक बाबमध्ये आज एकूण 1550 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आजपर्यंत एकूण 49 हजार 346 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज राज्यात एकूण 113 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर सध्या 51 हजार 379 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आज झालेल्या 113 मृत्यूंपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबईत आज 69, ठाण्यात 3, पुण्यात 10, नवी मुंबई 8, कल्याण-डोंबिवलीत 1, पनवेल, 6, सोलापूर 8, सातारा 1, औरंगाबाद 3, लातूर 2, नांदेड 1, यवतमाळमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाला आपले प्राण गमवावे लागले आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी 73 पुरुष आणि 40 महिलांचा समावेश आहे. आज नोंद झालेल्या मृतांपैकी 113 रुग्ण 60 वर्षांवरील, 65 रुग्ण हे 40 ते 59 वयोगटातील आणि 10 रुग्ण 40 वर्षाखालील आहेत. तर 83 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोगासह इतर आजार होते. तर 10 रुग्णांच्या इतर अतिजोखमीच्या आजाराबद्दल माहिती उपलब्ध झालेली नाही.
कोरोनाबाधित रुग्णांचा रिकव्हरी रेट 47.3 टक्के
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 4 हजार 568 वर पोहोचली तरी आतापर्यंत एकूण 49 हजार 346 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याची प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट 47.2 टक्के एवढा आहे. तर राज्यातील मृत्यूदर 3.7 इतका आहे.
सध्या राज्यात 5 लाख 83 हजार 302 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात 1580 संस्थात्मक क्वॉरंटाईन सुविधांमध्ये 79,074 खाटा उपलब्ध असनू सध्या 28,200 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईन आहेत.
Leave a comment