दिवसभरात 1 बाधीत ; 9 अहवाल नाकारले
बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यातून शनिवारी (दि.13) सकाळी तपासणीला पाठवण्यात आलेल्या 99 पैकी 1 पॉझिटिव्ह तर उर्वरित 89 जणांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत. 9 जणांचे स्वॅब अनिर्णयीत आहेत. दरम्यान मागील चार दिवसांपासून बाधीत रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्येला यामुळे काही अंशी ब्रेक मिळाला आहे.आता 22 जणांवर उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अन्य दोघे कोरोना बाधीत निष्पन्न झाल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली होती. नुकतेच 8 जूनला अंबाजोगाई येथे कोरोना चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे हाय रिस्क कॉन्टॅक्ट ट्रेस करण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर होते.नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन आरोग्य चाचणीसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच मुंडे यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीनी 28 दिवस गृह अलगीकरणात रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले, त्यानंतर ते स्वतः सेल्फ कोरनटाईन झाले आहेत. पाठोपाठ शनिवारी पोलीस अधीक्षकही गृह अलगीकरणात काम करत आहेत.
अशा साऱ्या अस्वस्थतेच्या स्थितीत जिल्ह्यातून शनिवारी सकाळी आणखी 99 व्यक्तींचे स्वॅब तपासणीला अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यातील काही रिपोर्ट दुपारी प्राप्त झाले; त्यात परळी येथील माधवबाग भागातील एक 35 वर्षीय तरुण कोरोना बाधीत निष्पन्न झाला तर 30 जणांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आणि 4 जणांचे स्वॅब अहवाल नाकारण्यात येऊन उर्वरित 64 जणांचे रिपोर्ट प्रलंबित ठेवण्यात आले होते, ते सर्व रिपोर्ट शनिवारी रात्री जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले. यात 64 पैकी 59 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 5 संशयित व्यक्तींचे थ्रोट स्वॅब नाकारण्यात आले आहेत. दिवसभरात एकूण 89 व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्याने बीड जिल्हा वासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना रिपोर्ट बीड जिल्हा
निगेटिव्ह अहवाल - 89
पॉजिटिव्ह अहवाल - 01
रिजेक्टेड - 09
Leave a comment