माजलगाव / प्रतिनिधी
30 ऑक्टोबर 2023 ला मराठा आंदोलनाच्या आडून काही गुंड शक्तींकडुन आ प्रकाश सोळंके यांचा बंगला जळाला होता. या प्रकरणी आ सोळंकेच्या सांगण्यावरून आम्हाला निष्पाप असून त्या प्रकरणात गोवले गेले.ऐन दिवाळीत तीन महिने आम्ही गुन्हा नसताना फरार होतो तीन महिने आ सोळंकेनि काय केले आज निवडणुकीच्या तोंडावर त्यांना फाशी घेण्याची भाषा आठवत आहे. मग त्यावेळीच निष्पाप लोकांच्या पाठीशी का राहिले नाही. असा सवाल या प्रकरणातील सर्व मराठा तरुणांनी केला.
आ सोळंकनि आम्हाला विनाकारण या प्रकरणात गोवले आमचे आयुष्य बरबाद केले. आम्ही आणि आमचे कुटुंब आ सोळंके ना कधीच माफ करणार नाही या निवडणुकीत त्यांना अद्दल घडवू असे या युवकांनी सांगितले.
यावेळी रामचंद्र डोईजड लखन सावंत गोविंद चिरके कृष्णा ढाळे ऋषिकेश शिंदे रोहन कापसे कृष्णा नेरडे ,अशोक नेरडे ,आकाश कारळकर ,महेश घायतिडक,नागेश पांढरपोटे प्रशांत पांढरपोटे अभिषेक आगे संतोष गुजर प्रकाश आगे माऊली आगे आदी तरुणांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
मोहन जगताप यांना पाठींबा
यावेळी भावनिक झालेल्या या तरुणांच्या चेहऱ्यावर आ सोळंके विषयी प्रचंड राग, चीड त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती.त्यांनी आ सोळंकेना पाडण्यासाठी मोहन जगताप हेच सक्षम उमेदवार असल्यामुळे त्यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.
Leave a comment