माजलगाव: उमेश जेथलिया 

      माजलगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार मोहनराव जगताप यांना महायुतीच्या मत विभाजनाचा मोठा फायदा होत असून पहिल्या दोन टप्या नंतर तिसऱ्या टप्यातही मोहनराव जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतल्यामुळे तुतारी विजयाच्या मार्गावर असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर माधव निर्मळ  महायुतीचे मित्र पक्ष असलेल्या भाजपचे बंडखोर रमेश आडसकर  व बाबरी मुंडे हे सर्व महायुतीचे अधिकृत उमेदवार आ प्रकाश सोळंके यांच्या परंपरागत मतांचीच विभागणी मोठया प्रमाणात करत असून मोहनराव जगताप यांच्या महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी एकदिलाने काम करत असल्याचा फायदा मोहनराव जगताप यांना होईल असे चित्र आहे.

          माजलगाव मतदारसंघ हा मागील 30 वर्षांपासून भाजप व मुंडे परिवारास मानणारा मतदार संघ म्हणून ओळखला जातो.  स्व गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराला ओबीसी तसेच भाजप विचाराचा अति अल्पसंख्याक मारवाडी वाणी ब्राम्हण कोमटी तसेच हिंदुत्ववादी विचारांना मानणारा मराठा समाज येथे मोठया प्रमाणात आहे.मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी प्रवर्गातून महायुतीचे राष्ट्रवादी बंडखोर माधव निर्मळ तर भाजप बंडखोर बाबरी मुंडे यांच्यामुळे महायुतीचा सगळ्यात मोठा आधार असणारा ओबीसी प्रवर्ग 60 ते 70%  महायुतीपासून दुरावला गेला आहे. याचा मोठा फायदा महाविकास आघाडीचे मोहन जगताप यांना होत आहे. शिवाय भाजप कडून 2019 ची निवडणूक लढवलेले भाजप बंडखोर रमेश आडसकर मराठा मताचे विभाजन करत आहेत. एकूण सर्वच घटनाक्रम महाविकास आघाडीचे मोहनराव जगताप यांच्या विजयाच्या दृष्टीने सोयीस्कर झाल्याचे दिसत आहे.

नियोजन व प्रचारात सुसूत्रबद्धता

       महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन जगताप यांच्या प्रचारात व नियोजनात नितीन नाईकनवरे, शरद यादव संतोष यादव अविनाश गोंडे यांनी सुसूत्रबद्धता आणली असून माजलगाव तालुक्यात माजी आ बाजीराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्कल वाईज मेळावे  तसेच खा बजरंग बजरंग सोनवणे यांनी धारूर तालुक्यात लावलेले तगडे नियोजन जगताप यांना प्रचारात आघाडी देणारे ठरत आहे.

मित्रपक्षही जीवतोडुन काम करू लागले

        महाविकास आघाडीचे मित्रपक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, भाकप, माकप, शेकाप, शेतकरी संघटना, विवेक पोटभरे मित्रमंडळ चे सर्व पदाधिकारी जीवतोडुन कामाला लागले दिसून येत आहे.

सर्व जाती धर्माची मोट बांधली 

  प्रत्येक मेळाव्यात सभाना सर्व जाती धर्माच्या नेतृत्वाची बांधलेली मोट मतदार वर्गास विचार करण्यास भाग पाडते दयानंद स्वामी, कचरू खळगे,मिलिंद आवाड,ऍड गवळी ,नानासाहेब घोडके,सुनील शिंदे, अरुण इंगळे, विलास बडे,अंगद मुंडे, रामदास तिडके, सहाल चाऊस,मुत्सद्दीक बाबा,राज अर्जुन ,शंकर काळे, राम राठोड, माणिक राठोड,सर्जेराव शिंदे, दत्ता कांबळे,गोविंद करवा, बप्पा देशमुख असे आठरा पगड जाती धर्मातील सर्वांची मोट बांधण्यात मोहनराव जगताप यांना यश आले आहे.यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे दिसत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.