उमेश जेथलिया
जयसिंग सोळंके यांच्या समर्थनार्थ 100 वाहनाचा ताफा सकाळी 9 वाजता बारामती येथे अजित पवार यांच्या बंगल्यावर गेले असता अजित पवार यांनी काका पुतण्यानी बसून निर्णय घ्यावा असे सांगितल्या नंतर जयसिंग सोळंके व आ प्रकाश सोळंके यांची बैठक होऊन आपसात समन्वय होऊन आ प्रकाश सोळंके यांनीच निवडणूक लढण्याचे अखेर ठरले असून आज 29 रोजी सकाळी 11 वाजता साध्या पद्धतीने अर्ज भरणार आहेत. यामुळे काका पुतण्यातील वादाला तात्पुरता पूर्णविराम भेटला आहे. काका पुतण्याचे राजकीय नाते अभेद्य राहिल्यामुळे जयसिंग सोळंके यांच्या समझदारीचे व समयसुचकतेचे कौतुक होत आहेत.
100 वाहनाचा ताफा अजित पवाराच्या भेटीला
बीड जिल्ह्याचा अभेद्य पुतण्या म्हणून पाठ थोपटून घेणारे जयसिंग सोळंके जगताप यांची उमेदवारी जाहीर होताच ऍक्शन मोडवर आले असून मला नाहीतर काकालाही नाही म्हणत काल रात्री 100 वाहनाचा युवकांचा ताफा जयसिंग सोळंके यांच्या परवानगीने अजित पवार यांच्या भेटीसाठी बारामतीला गेला असता अजित पावर यांनी काका पुतण्यानी बसून तोडगा काढावा माझ्याकडे येण्याची गरज नाही असे सांगत युवकांना परत पाठवले.
अजित पवार यांची कथित क्लिप व या क्लिप मधील आडसकर विरोधात आ प्रकाश सोळंके हवे या संवादाचा धागा पकडून काल पून्हा काही युवकांनी अजित पवार यांच्या कार्यालयाशी संपर्क करून समोरून जगताप आले आता जयसिंग सोळंकेना उमेदवारी दया म्हणत बंडखोरीचे निशाण फडकविले होते आणि तात्काळ बारामती गाठण्यासाठी धारूर, हिंगणी, मोहखेड, वडवणी हुन सुमारे 100 वाहनाचा ताफा अजित पवार यांना निर्वाणीचा इशारा देण्यासाठी गेला होता.
Leave a comment