पावणेदोन लाख शेतकर्‍यांची दोन लाख हेक्टर वरील पिके बाधित; शिरुर,केज,वडवणी तालुके वगळता आठ तालुक्यात नुकसान

बीड । वार्ताहर


बीड जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल 61 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. याचा फटका खरीप हंगामातील तूर, बाजरी,उडीद, कांदा, मूग आणि भाजीपाल्याला बसला आ हे. कृषी विभागाने केलेल्या पाहणीतून जिल्ह्यात 611 गावांमधील 125 हजार 724 शेतकर्‍यांचे तब्बल 2 लाख 3 हजार 415 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे दरम्यान पावसाने
उघडीप दिल्यानंतर महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांकडून नुकसानीचे पंचनामे केले जाणार आहेत.

जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर यांनी जिल्ह्यातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे. बीड जिल्ह्यात मागील दोन दिवसात मुसळधार पावसामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. फळबागांना फटका बसला, तसेच भाजीपाला जमीनदोस्त झाला. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्यामुळे कापूस आणि सोयाबीनचे पीक धोक्यात सापडले आहे. काही ठिकाणी पिके पिवळी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात शिरूर कासार, केज आणि वडवणी हे तीन तालुके वगळता इतर आठ तालुक्यातील 611 गावांमध्ये मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. आता पावसाने उघडीप दिल्यानंतर कृषी आणि महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांकडून संयुक्त पंचनामे केले जाणार आहेत. त्यानंतर 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची संख्या तसेच त्यांचे हेक्टरनिहाय झालेले पीक नुकसान याबाबतचा विस्तृत अहवाल तयार करून शासनाकडे पाठवला जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी ‘लोकप्रश्न’शी बोलताना दिली. दरम्यान हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून नेल्याची भावना शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे.

 
 
 
 
 
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.