बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेची पुणे येथे कारवाई

 

 बीड / वार्ताहर

 

राज्यस्थानी मल्टीस्टेटच्या माध्यमातून हजारो ठेवीदारांना गंडविणाऱ्या चंदुलाल बियाणी याचा मुलगा असलेल्या अभिषेकला पुण्यातून बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि.31) पहाटे ताब्यात घेतले.

 

राज्यस्थानी मल्टीस्टेटचा चंदुलाल बियाणी फरार असून शनिवारी पहाटे त्यांच्या मुलाला बीड पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले. मागच्या अनेक महिन्यांपासून मल्टिस्टेट प्रकरणातील आरोपी बीडच्या पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरत होते.पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार घेतल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाला आणखीन वेग येऊ लागला आहे. दरम्यान शुक्रवारी  ज्ञानराधाच्या यशवंत कुलकर्णीला पुण्यातून ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी पहाटे राज्यस्थानी मल्टीस्टेटच्या चंदुलाल बियाणीच्या मुलगा अभिषेकला आर्थिक गुन्हे शाखेने पहाटे ताब्यात घेतले. अभिषेक बियाणीला बीडला आणले जाणार आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.