बीड । वार्ताहर
ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगारांना प्रशिक्षण देवून ज्यांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले अशा उमेदवारांना बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करुन देत त्यांच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न ज्य प्रशिक्षण केंद्रातून केला जातो, त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये मोठ्या संख्येने महिला उमेदवार असतात. आत्तापर्यंत या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हजारो महिलांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मात्र हे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रशिक्षण केंद्र थेट शहराबाहेरील खजाना विहिरीनजिक नेण्याचा एसबीआयच्या अधिकार्यांनी घाट घातला आहे. महिला उमेदवारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय आत्मघातकी ठरणार आहे.
https://www.lokprashna.com/
राज्यात महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे अगदी शाळा-महाविद्यालय स्तरावर महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ते योग्य निर्णय घेतले जात आहेत.एकीकडे ही स्थिती असताना आता बीडमध्ये मात्र एसबीआयच्या अधिकार्यांना महिलां-मुलींच्या सुरक्षेचे गांभीर्य कळलेले दिसत नाही. त्यामुळेच या अधिकार्यांनी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रशिक्षण केंद्र चक्क शहराबाहेर 5 कि.मी अंतरावर हलवले आहे. यामुळे या प्रशिक्षण केंद्रामध्ये महिला जाणार कशा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरातील भरवस्तीमध्ये व्यवस्थित सुरु असलेल्या प्रशिक्षण केंद्रांच्े स्थलांतर नेमके कशासाठी केले जात आहे असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान प्रशिक्षणार्थी महिलांमध्ये या निर्णयामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
Leave a comment