योगेश क्षीरसागरांना संधी मिळाली तर सोनं करतील
बीड । वार्ताहर
बदलेली राजकीय स्थिती आणि त्यात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांच्याकडे सक्षम युवक नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. अजितदादांच्या जनसन्मान यात्रेची संपूर्ण जबाबदारी योगेश क्षीरसागरांवर सोपवण्यात आली आहे. यातूनच नेमका संदेश दिला गेला आहे. महत्वाचे म्हणजे बीड मतदार संघाच्या सर्व समाज घटकांपर्यंत पोहचलेले युवानेतृत्व म्हणून डॉ.योगेश क्षीरसागरांचे नाव आता पुढे आले आहे. म्हणूनच योग्य वेळी योग्य ती संधी डॉ.योगेश क्षीरसागरांना मिळाली तर ते नक्कीच या संधीचं सोनं करतील अशी चर्चा बीडमध्ये होत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज बीडमध्ये ‘जनसन्मान यात्रेे’निमित्त दाखल होत आहेत. अजितदादा हे स्पष्टवक्ते आणि नेमकेपणाने भूमिका मांडणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पक्षाची विचारधारा आणि युवकांसह जेष्ठ नागरिक,महिला भगिणी या सर्वांना सोबत घेवून वाटचाल करत असलेल्या क्षीरसागर घराण्यातील युवक नेतृत्व योगेश क्षीरसागर यांच्या रुपाने नवा कोरा चेहरा बीड विधानसभा मतदारसंघासाठी मिळाला आहे. त्यांची काम करण्याची हातोटी, विविध समाज घटकांशी असलेले स्नेहाचे संबंध, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्यासाठी उभारलेली यंत्रणा आणि याही पुढे जावून त्यांच्याकडे असलेले ‘इलेक्टिव्ट मेरिट’ या डॉ.योगेश आणि डॉ.सारिका क्षीरसागर यांच्या जमेच्या बाजू आहेत. राजकारणात योग्यवेळी मिळालेली संधी नेतृत्व घडवत असते. आता बीड मदार संघात योगेश क्षीरसागर यांच्या रुपाने हे घडू शकते.मात्र त्यासाठी पक्ष नेतृत्वाकडून त्यांना बळ मिळायला हवे अशी लोकभावना बीड मतदार संघातून व्यक्त होत आहे.
Leave a comment