प्रकल्पीय पाणीसाठा 20 टक्क्यांवर पोहचला

 

बीड । वार्ताहर

 

बीड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपूर्वी पाच तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 36 प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. पाणीसाठा वाढल्याने शेतकर्‍यांत समाधान व्यक्त केले जात असून खरीपाच्या पिकांनाही पावसामुळे जीवदान मिळाले आहे. मात्र अजुनही 63 प्रकल्पांची पाणीपातळी ज्योत्याखाली असून 13 प्रकल्प कोरडेठाक पडलेले आहेत. आता जिल्ह्यातील प्रकल्पीय पाणीसाठा 20 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला आहे.

 

.
बीड जिल्ह्यात गोदावरी व कृष्णा खोर्‍यांतर्गतचे 143 प्रकल्प आहेत. यातील 13 प्रकल्प कोरडे पडले असून मातीच्या खपल्या पडल्या आहेत. जिल्ह्यातील एकमेव मोठ्या माजलगाव प्रकल्पात सध्या 117.600 दशलक्ष घनमीटर पाणी असून बीडच्या बिंदूसरा धरणात 0.356 दलघमी पाणीसाठा आहे. सिंदफणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सध्या या प्रकल्पात 7.356 दलघमी पाणीसाठा आहे. महत्वाचे की, मोठ्या पावसाची अपेक्षा व्यक्त होत असतानाच मागील दोन दिवसांपूर्वी पाच तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 36 प्रकल्प 100 टक्के भरले आहेत.

 

दरम्यान सध्या 63 प्रकल्पाची पाणी पातळी जोत्याच्याखाली गेली आहे. 6 मध्यम व 30 लघु असे एकूण 36 प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. यात सिंधफणा, कडा मध्यम प्रकल्प, पाटोदा तालुक्यातील इंचरणा ल.पा. लांबरवाडी, सौताडा, भुरेवाडी साठवण तलाव, वसंतवाडी सा.त.आष्टी तालुक्यातील किन्ही, चौभानिमगाव ल.पा.बेलगाव,मातकुळी, सुलेमान देवळा, धामणगाव, जळगाव साठवण तलाव व अन्य प्रकल्पांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात 1 लघु प्रकल्प 75 टक्के भरला आहे. तसेच 7 प्रकल्पांमध्ये 50 ते 75 टक्के पाणी साठा उरला आहे. इतर 11 प्रकल्प 25 ते 50 टक्के क्षमतेने भरलेले आहेत. तर अन्य 12 प्रकल्प असे आहेत की त्यामध्ये 25 टक्कयांपेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गोदावरी खोर्‍या अंतर्गतचे 10 व कृष्णा खोर्‍या अंतर्गतचे 6 अशा 16 मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या 40.03 टक्के तसेच गोदावरी खोर्‍या अंतर्गतच्या 99 लघु व कृष्णा खोर्‍या अंतर्गतच्या 27 लघु प्रकल्पांमध्ये मिळुन 33.47 टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्प भरण्यासाठी अजुनही मोठ्या पावसाची गरज आहे.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.