स्वच्छ बचत गटांसोबत संवाद मोहिम उपक्रमाचा शुभारंभ
बीड । वार्ताहर
जिल्ह्यातील 1350 गावात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम सुरू आहे.दररोज प्रत्येक कुटुंबाचा जमा झालेला कचरा त्याचे वर्गीकरण कुटुंब स्तरावरच करण्यासाठी मानसिकता तयार करण्याकरिता आता स्वच्छ बचत गटांचा पुढाकार असणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगितादेवी पाटील यांनी ही माहिती दिली. स्वच्छतेचे काम, स्वच्छ बचत गटांसोबत संवाद मोहिम या उपक्रमाचाशुभारंभ मंगळवारी (दि.6) करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
प्रत्येक गावात जमा होणार्या कचर्याचे वर्गीकरण केंद्र तयार करण्यात आलेले आहे.कुजणारा व न कुजणारा कचर्याचे वर्गीकरण करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांची मानसिकता तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. बीड जिल्ह्यातील 1350 गावात घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन व प्लास्टिक व्यवस्थापनाचे काम सुरू आहे. जमा झालेल्या कचर्याचे वर्गीकरण जर केले नाही तर कचर्याचे योग्य विघटन होणार नाही व त्याचा ताण ग्रामपंचायत वरती येणार आहे. त्यामुळे दृश्यमान स्वच्छतेची सुरुवात कुटुंब स्तरावर होण्यासाठी गृहभेटी हा एकमेव जनजागृतीचा मार्ग सध्या प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील बचत गटातील सदस्य स्वच्छतेच्या या उपक्रमात सहभागी होणार आहेत अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संगीतादेवी पाटील यांनी सांगितले.
स्वच्छतेच्या उपक्रमात हिरवा रंग ओल्या कचर्यासाठी तर निळा रंग सुक्या कचर्यासाठी असल्यामुळे याबाबतची माहिती सर्व महिलांना देण्याकरिता ही संवाद मोहीम आयोजित केली असल्याची माहिती विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर मुंडे यांनी दिली. तसेच साथीचे आजार थांबवायचे असतील व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थित ठेवायचे असेल तर सांडपाणी तसेच घनकचर्याचे योग्य व्यवस्थापन झालेच पाहिजे ही भूमिका ग्रामपंचायतीची आहे. परंतु सांडपाणी व कचरा करणारे लोक गावातीलच आहे त्यामुळे अगोदर या संबंधीची मानसिकता तयार करून कचरा वर्गीकरण शेडमध्ये जमा होण्याकरिता नियोजन केले असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. येत्या 31 ऑगस्टपर्यंत चालणार्या या गृहभेटीच्या संवाद मोहिमेत सर्व बचत गटांच्या सदस्यांनी सहभागी व्हावे तसेच दृश्यमान स्वच्छतेसाठी जनजागृती करावी सांडपाणी व्यवस्थापना संबंधीची माहिती देणार्या या उपक्रमाचे सनियंत्रण उमेद तालुका कार्यालय व स्वच्छ भारत मिशन गट कार्यालय यांचे मार्फत होणार आहे.
Leave a comment