बीड | वार्ताहर
सामाजिक उपक्रमामध्ये प्राधान्याने पुढाकार घेऊन समाजसेवेचे तप पूर्ण करणारे शिवसेना जिल्हप्रमुख अनिल जगताप व सचिन मुळूक यांनी शिवसेना वर्धापन दिनानिमित्त बीड शहरातील पंधरा हजार शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. बीड शहरातील कंकालेश्वर विद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, केएसपी विद्यालयासह अनेक शाळांनमधील तब्बल पंधरा हजार विद्यार्थ्यांना काल दि. 30 जुलै रोजी शालेय साहित्य वाटप केले. याबरोबरच शाळेतील विद्यार्थी तथा शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या समस्यां सोडवण्यासाठी शिवसेना कठीबद्ध असल्याचे आश्वासन अनिल जगताप आणि सचिन मुळूक यांनी दिले.
यादरम्यान शाळा व्यवस्थापनाकडून अनिल जगताप, सचिन मुळूक यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन शिवसेनेचे धनुष्य आम्ही उचललेले आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि दिघे यांनी अंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के हे राजकारण करण्याचे संस्कार आम्हा शिवसैनिकांना दिलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ श्रीकांत शिंदे यांची राज्यातील सामान्य आणि गरजू लोकांसाठी असलेल्या आत्मीयतेला समोर ठेऊन आम्ही बीड जिल्ह्यात समाजसेवा करण्याला अधिक प्राधान्य देत आहोत. सातत्याने सांस्कृतिक, क्रीडा तसेच शैक्षणिक क्षेत्रात मुलांना यशाची गगन भरारी घेता यावी यासाठी विविध उपक्रम राबवत त्यांना आधार देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आता विद्यार्थ्यांनी देखील जिद्द, चिकाटी आणि मेहनत घेऊन अभ्यास करावा आणि आपल्या आई-वडिलांचे जिल्ह्याचे तसेच राज्याचे आणि देशाचे नाव उज्वल करावे ही जिम्मेदारी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांची आहे असे मत जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी आपल्या मनोगत भाषणात मांडले आणि विद्यार्थ्यांना अत्यावश्यक असणाऱ्या शालेय साहित्याचे वाटप केले. याप्रसंगी शिवसेनेच्या सुमन ताई गोरे सह संपर्कप्रमूख महिला आघाडी, अलकाताई डावकर सह संपर्कप्रमुख महिला आघाडी, रत्नमाला ताई आंधळे महिला आघाडी जिल्हाप्रमूख, चंद्रकला ताई बांगर महिला आघाडी जिल्हाप्रमूख, सुनिल सूरवसे जिल्हा संघटक, योगेश नवले जिल्हा संघटक, संतोष जाधव उपजिल्हाप्रमुख, मकरंद उबाळे तालुकाप्रमुख बीड, संजय उडान नगरसेवक, राहुल कदम सरपंच यांच्यासह शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a comment