'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चे अर्ज पुढील दोन दिवस शिबिर लावून मिशन मोडवर भरुन घ्यावे -: जिल्हाधिकारी अविनाश पाठक
बीड, दि. 12: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चे अर्ज पुढील दोन दिवस शिविर लावून मिशन मोडवर भरुन घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
आज जिल्हाधिकारी बीड यांनी बीड जिल्हयातील सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्यधिकारी नगर परिषद / नगरपंचायत, बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण / शहरी यांची ऑनलाईन बैठक घेवून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ची प्रभावी अमलबाजवणी करणेसाठी सूचना दिल्या.
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने" साठी "नारी शक्तिदूत" ऍ़पव्दारे अर्ज भरताना संबधित महिलेचे नांव जन्म दिनांक, संपुर्ण पत्ता आदी माहिती आधारकार्ड नुसारच भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. गावपातळीवर तसेच नगर पलिका,नगर पंचायत अंगणवाडी केंद्रामध्ये ऑन लाईन अर्ज भरण्यास येणा-या समस्या, तांत्रिक अडचणी पाहता ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकरी बीड यांनी संबधित विभागास सूचना दिलेल्या आहेत. "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने" बीड जिल्हयातून मोठया प्रमाणात अर्ज भरण्यात येत आहेत. लाभार्थी महिलेला 1500/- रुपये थेट डी.बी.टी.व्दारे बँक खात्यावर जमा होणार आहे.त्यामुळे यात कोणतेही अडचण येऊ नये म्हणून योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.
असे होईल नारी दूध ॲपच्या माध्यमातून अद्यावतीकरण
"नारी शक्तिदूत" ऍ़पमध्ये लाभार्थी महिलेचे नाव भरताना त्यांच्या आधारकार्डवर जे नाव आहे तेच नाव अर्जात लिहावे , आधार कार्डवरील जन्म दिनांक ऍ़पमध्ये नोंदवावा आधारकार्डवरील जन्म दिनांक नसल्यास जन्म दाखल्यावरुन जन्म दिनांक घेण्यात यावा. आधारकार्डनुसार अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आणि अन्य माहिती तंतोतत भरावी. अशी सुचना करण्यात आली आहे. आधारकार्डवरील नावाप्रमाणे बँकेच्या खात्यावरही तेच नाव असल्याची खातरजमा करावी. आधार क्रंमाक बँकेशी संलग्न असल्याची खात्री करुन तशी माहिती ऍ़पमध्ये भरावी अशी सूचना करण्यात आली आहे.
बीड जिल्हयातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखानी महिलांचे "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने" साठी बँक खाते शुन्य ठेव स्वरुपात उघडण्याची तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचना जिल्हाधिकारी बीड यांनी दिल्या आहेत.
दोन दिवस विशेष शिबिर
शनिवार व रविवार रोजी दिवसभर बीड जिल्हयात "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, नगर परिषद क्षेत्रीय वार्ड अधिकारी यांनी कॅम्प करिता उपस्थित राहावे. अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.
सदर बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संगितादेवी पाटील, उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)श्री.मोकाटे उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क) श्री.केकान उपस्थित होते.
ही कागदपत्र असणे आवश्यक
Leave a comment