बीड जिल्ह्यातील 37 प्रकल्प कोरडे
 

बीड । सुशील देशमुख

 

वाढत्या तापमानामुळे बीड जिल्ह्यातील 37 प्रकल्प कोरडे पडले आहेत. आता सर्व प्रकल्पात मिळून 3.42 टक्के म्हणजेच 26.251 दश लक्ष घनमीटर इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. दरम्यान जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 297 गावांसह 277 वाड्यांसह पाटोदा व शिरुरकासार नगरपंचायत हद्दीत राहणार्‍या 5 लाख 18 हजार 861 ग्रामस्थांसाठी प्रशासनाकडून 322 टँकरव्दारे दररोज 635 खेपा करुन पाणी पुरवठा केला जात आहे. एकीकडे पावसाळा सुरु असला तरी दुसरीकडे अजुनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम असल्याचे दिसून येते. पावसामुळे 111 टँकर कमी झाले आहेत, कारण गत महिन्यापर्यंत जिल्ह्यात 422 टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता.

 

बीड जिल्ह्यात गोदावरी व कृष्णा खोर्‍यांतर्गतचे 1 मोठा, 16 मध्यम व 126 लघु असे 143 प्रकल्प आहेत.तर बीड पाटबंधारे विभागातंर्गत 1 मध्यम व 22 लघु असे एकूण 166 प्रकल्प आहेत. यातील 40 प्रकल्प कोरडे पडले आहेत. सध्या ‘माजलगाव’ हा मोठा प्रकल्प कोरडा पडलेला आहे. या ठिकाणी 106.400 दश लक्ष घनमीटर इतका मृत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. बीड तालुक्यातील पाली येथील ‘बिंदूसरा’ मध्यम प्रकल्पात 7.105 दलघमी इतका प्रकल्पीय संकल्पिय साठा शिल्लक आहे. सिंदफणा प्रकल्पात 0.988 दलघमी पाणीसाठा आहे.

 

सद्यस्थितीत बीड जिल्ह्यातील 74 प्रकल्पांची पाणी पातळी जोत्याच्या खाली असून 100 ते 75 टक्के क्षमतेने एकही प्रकल्प भरलेला नाही. केवळ 1 प्रकल्पामध्ये 50 ते 75 टक्के पाणीसाठा आहे. इतर 7 प्रकल्प 25 ते 50 टक्के क्षमतेने भरलेले आहेत. अन्य 23 प्रकल्पांची पाणीपातळी 25 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. माजलगाव प्रकल्पामध्ये सध्या उपयुक्त पाणीसाठाच शिल्लक नाही. गोदावरी खोर्‍यातंर्गतचे 10 व कृष्णा खोर्‍या अंतर्गतचे 6 अशा 16 मध्यम प्रकल्पांत 13.717 दलघमी (9.06 टक्के) तसेच गोदावरी खोर्‍या अंतर्गतच्या 99 लघु व कृष्णा खोर्‍या अंतर्गतच्या 27 अशा एकूण 126 लघु प्रकल्पांमध्ये 10.987 दलघमी (4.35 टक्के) इतकाच पाणीसाठा आहे.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.