बीड | सुशील देशमुख
केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.या वेळापत्रकानुसार महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे. हे मतदान 13 एप्रिल, 7 मे , 13 मे , 20 मे , 25 मे रोजी होईल. बीड लोकसभेसाठी 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणूकांच्या तारखांच्या निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. आताच झालेल्या पत्रकार परिषदेत आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार देशात 7 टप्प्यात तर राज्यात.5 टप्प्यात मतदान होणार आहे. बीड लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात म्हणजे 13 मे रोजी मतदान होईल. तर मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.
बीड लोकसभेसाठी येत्या 18 एप्रिल रोजी अधिसूचना निघणार असून त्यानंतर 25 एप्रिल ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे. 26 एप्रिल रोजी दाखल उमेदवारी अर्ज यांची छाननी केली जाणार असून 29 एप्रिल रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असणार आहे त्यानंतर 13 मे 2024 रोजी बीड लोकसभेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि 4 जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. एकंदरच गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या बीड लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या सध्या 21 लाख 15 हजार 813 इतकी आहे. आणखी काही दिवस मतदान नोंदणी सुरू राहणार आहे
Leave a comment