माजलगावला मूकनायक सोहळ्यात आ सोळंके स्पष्ट बोलले
माजलगाव / प्रतिनिधी
आज घडीला जो तो माझ्याकडे आला की नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असे म्हणतो. एकूण वातावरण बघितले तर नरेंद्र मोदी सोडता आज देशाजवळ नवा पर्याय ही दिसत नाही इंडिया आघाडीचा आजून मेळ नाही मेळ ;बसला तर पंतप्रधान कोण हा प्रश्न अनुत्तरीत आहे.म्हणून मोदी शिवाय पर्याय नाही असे स्पष्ट मत आ प्रकाश सोळंके यांनी आज मुकनायक पुरस्कार वितरणा वेळी केले.महाराष्ट्र पत्रकार संघाकडून माजलगाव येथे शुक्रवार (दि.23) फेब्रुवारी रोजी मूकनायक व माजलगाव भूषण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे, उदघटक आ.प्रकाश सोळंके तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नेते रमेश आडसकर, भाजपचे मोहन जगताप, बाबुराव पोटभरे लोकपत्रकार भागवत तावरे, शेकापचे मोहन गुंड ख्यातनाम लेखक गायक धम्मा धन्वे, माहअचे राजेश घोडे, सभापती जयदत्त नरवडे, उपसभापती श्रीहरी मोरे, पंजाबराव मस्के, दगडू चव्हाण यांची उपस्थिती होती
लोकशाहीमध्ये पत्रकार नावाच्या व्यक्तीला अतिशय महत्त्व आहे पत्रकार नेहमीच नेक बाजूने आपली बातमी दारी करत असतो त्यामुळे पत्रकारांचा आवाज दाबला जाता कामा नये असे मत आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केले तर तर आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे म्हणाले की, महाराष्ट्र पत्रकार संघाकडून आयोजित करण्यात आलेला सोहळा अतिशय कौतुकास्पद आहे. या भूमीत मला पहिल्यांदा मूकनायक पुरस्कार दिला गेला आणि आज याच मुकुनायक सोहळ्याचा अध्यक्ष म्हणून मान मिळाला. असे प्रतिपादन डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी व्यक्त केले. दरम्यान बाबुराव म्हणाले की, कोणत्याही महापुरुषांना जातीपाती बांधता येणार नाही. सर्वांनी मिळून-मिसळून बंधू भावाने राहण्याचा काळ आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना आमदार प्रकाश साळुंके म्हणाले लोकशाहीत पत्रकारितेकडे महत्त्वाचा खांब म्हणून पाहिले जाते पत्रकारितेमध्ये प्रचंड मोठी ताकद आहे मात्र पत्रकारिता करत असताना ती तेवढीच समर्पक आणि निपक्षपाती असायला हवी असे मत व्यक्त केले तर ओमप्रकाश शेटे म्हणाले की, आज माझ्याकडे सगळेजण सकारात्मक म्हणून पाहतात माजलगावचा भूमिपुत्र म्हणून मूकनायक सोहळ्याला कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहणे आपली नैतिक जबाबदारी होती. येणाऱ्या काळात पत्रकार संघाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा असणार आहोत. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा जो सन्मान झाला आहे. त्यामुळे त्यांना ऊर्जा मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
हा मुकनायक व माजलगाव भूषण पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी आयोजक महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब अडागळे, ता.अध्यक्ष वाजेद पठाण, ता.उपाध्यक्ष शेख मुजफ्फर, सचिव बाळासाहेब उफाडे, कोषाध्यक्ष अनंत घडसिंगे, सदस्य विजय कापसे, सदस्य विष्णूपंत नाईकनवरे, धैर्यशील ढगे यांनी मोलाचे परिश्रम घेतले. दरम्यान वैभवी नृत्य अकॅडमीच्या वैभवी टाखणखार, किंग्ज डान्स स्टुडिओचे सूरज टाकणखार, शाहीर युवराज ढगे, वेदिका फ्लिम प्रोडक्शनचे रहीभाऊ गवते यांचा माजलगाव कला भूषण पुरस्कार देवून गौरव करण्यात आला
यांचा झाला यथोचित सन्मान
महाराष्ट्र पत्रकार संघ शाखा माजलगावकडून विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो.त्या अनुषंगाने यंदाचा मूकनायक पुरस्कार पत्रकार संग्राम धन्वे, मिलिंद मुजमुले यांना प्रदान करण्यात आला तर माजलगाव भूषण पुरस्कार महाविर मस्के, अड.नारायण गोले पाटील, घनश्याम भुतडा, डॉ.युवराज कोल्हे, संजय सपाटे, गणेश डोंगरे, संघर्षकुमार ओवे, संरपच वंदना तपसे, सरताज शेख आणि वंदना उघडे यांना प्रदान करण्यात आला.
विद्यार्थ्यांना दिली कलेची संधी
मूकनायक दिनानिमित्त निबंध, व नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेला प्रत्येक शाळेतून विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. त्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ उत्साहात पार पडला यात, झेडपी शाळा कन्या माजलगव, झेडपी शाळा उर्दू व मराठी माध्यम पात्रुड, झेडपी मुलांची माजलगाव, जवाहर विद्यालय माजलगाव यांनी सहभाग नोंदवला होता.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment