जिल्हाप्रमुख रत्नमाला आंधळे यांचे प्रतिपादन
बीड । वार्ताहर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासन महिलांसाठी विविध योजना राबवित आहे. शिवसेना महिला आघाडी देखील आता महिलांचे महिला बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण करणार आहे, असे प्रतिपादन महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रत्नमाला आंधळे यांनी केले.
बीडमध्ये शिवसेना महिला आघाडीची आढावा बैठक दि.19 जानेवारी रोजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर आणि संपर्कप्रमुख सविता किवंडे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रत्नमाला आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी यावेळी संपर्कप्रमुख सविता किवंडे आणि महिला जिल्हाप्रमुख त्नमाला आंधळे यांनी महिला मार्गदर्शन केले. यावेळी सुमन गोरे, शकुंतला गोगाशे, गंगा येवने, मनीषा जाधव, गंगाबाई जाधव, मुक्ता मोरे, जनाबाई बिर्ले, राजूबाई मोरे, सोजरबाई पंडित, काळाबाई खवणे, अलका राऊत, कविता बळी, छाया छगन, चंद्रकला बळी, ठकुबाई वचरे, तारामती वसरे, कमल बळी, संगीता बळी, निर्मला गुगाचे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक महिला उपस्थित होत्या.
Leave a comment