पत्रकार विष्णू बुरगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना योगाचे धडे
बीड । वार्ताहर
गेवराई तालुक्यातील देवकी गावांमधून झी 24 तासचे जिल्हा प्रतिनिधी विष्णु बुरगे यांनी योग आणि ध्यानाची मुलांना सवय लावावी तसेच योग करून आपले शरीर तंदुरुस्त मुलांना ठेवता यावं तसंच निरोगी शरीर ठेवून सकारात्मक विचारांसाठी प्रेरणा मिळावी यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आलेला आहे. 4 तारखेपासून या शिबिराची सुरुवात करण्यात आली सात तारखेला म्हणजे उद्या या शिबिराचा समारोप होणार आहे रेवकी देवकी गावातील अडीचशे हून अधिक चिमुकल्यांनी या शिबिरामध्ये आत्तापर्यंत सहभाग नोंदवला आहे.
सध्या थंडीचे दिवस आहेत असं असलं तरी सकाळी सहा वाजता योग वर्गाला सुरुवात होत आहे रेवकी देवकी गावातील जिल्हा परिषद शाळेसह इतर शाळेतील ज्या आजूबाजूला आहेत तसेच वस्त्यावरील मुलं देखील या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद देताना दिसत आहेत.सकाळी सहा पासूनच मुलं शारीरिक व्यायाम शारीरिक अभ्यास करण्यासाठी जमायला सुरुवात झाली आहे मागील तीन दिवस नियमितपणे गावातील अनेक लहान मुलांनी योगाचे धडे घेतलेत हे शिबिर उद्या ही सुरू राहणार आहे.लहान मुलांना योगाचे धडे मिळावेत योग अभ्यास काय आहे याची माहिती मिळावी यासाठी एका पत्रकाराने सुरू केलेला हा खटाटोप. शिबिर सुरुवात झाल्यापासून मागील तीन दिवस मुलांमध्ये अनेक बदल झालेले आहेत, अनेक सवयी आता या शिबिरामुळे मुलांच्या बदलत चालले आहेत, बदलती जीवनशैली यामध्ये योग हा लहान मुलांना आपलं उत्कर्ष गाठण्यासाठी नक्कीच मोलाचा मार्ग बनवून येणार आहे रेवकी देवकी गावामध्ये बी एम प्रतिष्ठान, या शिबिराचे आयोजन केलेल आहे. गावातील लहान मुलांनी या शिबिराला चांगलाच प्रतिसाद दिलेला आहे.
निरोगी राहण्यासाठी तसेच सामाजिक जाणीव व्हावी या भावनेतून योग शिबिराचे आयोजन करण्यात आलेला आहे मागील तीन दिवस हे शिबिर दोन सत्रा मध्ये पार पडत आहे...पहिल्या सत्रामध्ये सकाळी सहा ते साडेसात या वेळेमध्ये योग आणि ध्यान याची माहिती मुलांना मिळते तर दुसर्या सत्र सायंकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान होतं या सत्रामध्ये मुलांना मूल्य संस्काराचे धडे दिले जातात शाळेमधून मूल्य संस्कार शिकवण्यासाठी शासनाने देखील या अगोदर धडपड केली आहे मात्र मूल्य संस्कार रुजवण्यासाठी मुलांमध्येच राहून हे विचार रुजवणं गरजेचं असतं त्यामुळे मागील चार दिवसांपासून विष्णू बुरगे यांनी गेवराई तालुक्यातील रेवकी देवकी गावात थांबत दोन्ही देखील सत्र तीन दिवस घेतलेली आहेत उद्या या दोन्ही सत्रांचा अर्थात योग आणि ध्यान त्याचबरोबर मूल्य संस्काराच्या शिबिराच्या दोन्ही सत्राचा समारोप झाला.
Leave a comment