गेवराई । वार्ताहर
तालुक्यातील गोदापात्रातून रात्रीच्या वेळेस अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याची ओरड नेहमीच होत होती. या ठिकाणी विशेष मोहिम राबवत सहायक जिल्हाधिकारी करिश्मा नायर व गौण खनीच अधिकारी माधव काळे यांनी सयुक्त कारवाई करत सावरगाव, म्हाळसपिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतूक करणारे 5 टिप्पर धरुन तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे वाळू माफियांसह स्थानिक महसूल, पोलिस प्रशासनामध्ये खळबळ उडाली असून, या कारवाईमुळे वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे.
सहायक जिल्हाधिकारी आदित्य जिवने यांनी वाळू पट्ट्यात धुमाकुळ घालणार्या वाळू माफियांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या होत्या. ते असेपर्यंत गोदावरीचे वाळू पात्र स्थिर होते. त्यांची बदली होताच. वाळू माफिया सक्रिय झाले असुन, दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाळूचे टिपर राजरोसपणे भरुन चालत आहेत. महसुल व गृह विभागाच्या कर्मचारी व अधिकार्यांना हाताशी धरुन वाळू माफिया गेवराई तालुक्याच्या गोदापात्रात अक्षरशा धुमाकुळ घालत आहे. धुमाकुळ घालणार्या या वाळू माफियांचे स्थानिक पोलिस महसुल प्रशासन सोबत लागे बांधे आहेत. त्यामुळे कारवाई करण्यास कोणी घजावत नाही. परिणाम अवैध वाळू वाहतूक करणा-या वाळू माफियांची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक ही तक्रार करण्यास घाबरत आहेत. तर स्थानिक तलाठी देखील वाळू माफियांना अधिकार्यांचे लोकेशन देवून प्रशासनास आडचनीत आणण्याचे काम करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच गोदावरी पात्राचे रक्षण होत नसल्यामुळे दररोज हजारो ब्रास वाळू चोरी होऊन लाखोंचा महसूल बूडत असल्याचे समोर आले आहे.
नव्याने आलेल्या सहायक जिल्हाधिकारी कविता नायर यांनी गौण खनीच अधिकारी माधव काळे यांच्या सोबत सयुक्त कारवाई करत, बूधवार दि.10 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान म्हाळसपिंपळगाव, सावरगाव येथील गोदापात्रात छापा टाकून विशेष मोहिम राबवत 5 टिप्पर पकडले. तब्बल 2 कोटी रुपयांचे मुद्देमाल जप्त करुन वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांच्या पाया खालची वाळू सरखली आहे. सदरिल कारवाई जिल्हाधिकारी दिपा मुधोळ, अप्पर जिल्हाधिकारी त्रिभून कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हाधिकारी कविता नायर, गौण खनीच अधिकारी माधव काळे, मंडळ अधिकारी सुनिल तांबारे, अंगद काशिद, तलाठी ससाने, पोहेकॉ,आघाव यांनी कारवाई केली आहे. जप्त वाहन तहसील कार्यालयात लावून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
Leave a comment