बावी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस
आष्टी : प्रतिनिधी
आष्टी तालुक्यामध्ये पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरीही रिमझिम पाऊस सोडता मोठा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे खरीप हंगामातील पिके तर गेले परंतु यापुढेही दुष्काळी परिस्थिती निर्माण होते की काय असा प्रश्न निर्माण झाला असतानाच शनिवारी दुपारी तीन वाजता सुरू झालेला पाऊस रात्रभरही सुरूच होता. या पावसाने आष्टी तालुक्यातील अनेक गावांमध्ये नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून ओढून आले तुडुंब भरून वाहत असल्याने एका दिवसात दुष्काळ वाहून गेला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्यात पावसाने दोन दिवसांपासून ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. अनेक दिवसानंतर समाधानकाक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पिके हातची गेली असली तरी आता पिण्यासाठी पाणीसाठा चांगला होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
आष्टी तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून पावसाने आखाडते घेतल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला होता. पाण्या अभावी पिके हातची गेली. बाजरी, तुर, कपाशी पिकानी तग धरला. पण आता परतीच्या पावसाने कडा, दादेगांव, डोंगरगण, घाटापिंपरी,धामणगांव, देवळाली, बीडसांगवी, बावी, धानोरा,लोणी सय्यदमीर, अंभोरा,जळगांव,मांडवा, यासह तालुक्यात जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागुन पाणीसाठा चांगला होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. बावी,देवी निमगाव ,खिळद, सांगवी,केरुळ,बीडसांगवी गावच्या नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे."
सध्या नगर बीड राष्ट्रीय महामार्गावरील साबलखेड ते आष्टी या रस्त्याचे काम सुरू असून अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने नालीचे काम अपूर्ण असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आलेली आहे आष्टी कडून नगरकडे जाणारी वाहतूक पर्याय मार्गाने वळविण्यात आली आहे अनेक ठिकाणी नाल्यात पाणी असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत
Leave a comment