अजित पवारांकडे अर्थ आणि नियोजन विभागाची जबाबदारी!

मुंबई : महाराष्ट्र सरकारचं मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर आज जाहीर झालं. मागील काही दिवसांमधील नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर हे खातेवाटप जाहीर झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांच्या रुपाने राष्ट्रवादीचा गट सामील झाल्याने, या खातेवाटपाकडे सर्वांचेच लक्ष होते. त्यात अजित पवारांकडे अर्थ खातं दिलं जाणार असल्याच्या चर्चा अगोदरपासून सुरू होत्या. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवारांना अर्थ व नियोजन विभागाची जबाबदारी दिली गेली आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे

अजित पवार - अर्थ आणि नियोजन
दिलीप वळसे पाटील - सहकार
हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य
छगन भुजबळ - अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
आदिती तटकरे - महिला व बालविकास
धनंजय मुंडे - कृषी
धर्मरावबाबा आत्राम- औषध व प्रशासन
अनिल पाटील – मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन
संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे

अमित शहांच्या भेटीनंतर तोडगा

अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी रात्री दिल्लीत अमित शाहांची भेट घेत प्रदीर्घ चर्चा केली. य बैठकीत राष्ट्रवादीला हवी असलेली खाती आणि राष्ट्रवादीला देता येतील अशी खाती यावर चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय. या भेटीनंतर दोन दिवसातच खातेवाटप जाहीर करण्यात आलं. तसंच विधानपरिषदेतल्या 12 जागांमध्येही राष्ट्रवादी अजित पवार गटाने वाटा मागितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य न्यायालयीन लढ्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग 

 

*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे* गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

 

*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे* वित्त व नियोजन हे खाते राहील. 

 

*इतर २६ मंत्र्यांची खाती  पुढीलप्रमाणे:*

 

छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार

राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास

सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य

चंद्रकांतदादा बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास

गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन

गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) 

संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण

धनंजय पंडितराव मुंडे - कृषि

सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार

संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय रविंद्र सामंत- उद्योग

प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण

रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), 

अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन

दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व  मराठी भाषा

धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन

अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क

कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास

संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे

मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता

अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

 

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.