मुंबई । वार्ताहर
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जवळचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला दादर येथे झाल्याची धक्कादायक समोर आली आहे. त्यांना तात्काळ हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. देशपांडे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. दादर येथील शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेलेले असताना अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे.
देशपांडे यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु
संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला वृत्त समजात काही कार्यकर्त्यांनी हिंदूजा रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. सध्या देशपांडे यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज सकाळी ते दादर शिवाजी पार्क येथे ते मॉर्निग वॉक करत होते. यादरम्यान देशपांडे यांच्यावर अज्ञांनी हल्ला केला आहे.संदीप देशपांडे यांच्यावर चार अज्ञात लोकांनी पाठिमागून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांच्या सहकार्याकडून देण्यात आली. ते मॉर्निग वॉकला गेले असता त्यांच्यावर चार लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात देशपांडे जखमी झालेत. त्यांना तात्काळ हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
मनसेच्या एका नेत्याने सांगितले की, त्यांच्या डोक्यावर जोरदार हल्ला करण्यात आला होता. मात्र, संदीप देशपांडे यांनी स्वतःचा बचाव केल्याने ते थोड्यात बचावले. यावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिवाजी पार्क परिसरात असताना त्यांच्यावर हल्ला 4 ते 6 जणांनी केला. हा हल्ला स्टॅम्पने करण्यात आला आहे. हल्लेखोरांना तोंडाला मास्क लावला होता. त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या ठिकाणी मनसे कार्यकर्ते जमा होत आहेत. त्यामुळे तणावात भर पडत आहे.
मास्क लावून आले
काही हल्लेखोर तोंडावर मास्क लावून आले होते. या हल्लेखोरांनी देशपांडे यांच्यावर हल्ला करून तिथून पळ काढला. जखमी अवस्थेतील देशपांडे यांना तात्काळ हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर मनसेचे नेते, पदाधिकारी आणी कार्यकर्ते तात्काळ हिंदुजा रुग्णालयात पोहोचले आहेत.
गर्दी असूनही हल्ला
संदीप देशपांडे रोज पहाटे शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला जात असतात. त्याप्रमाणे ते आजही मॉर्निंग वॉकला गेले होते. शिवाजी पार्कात सकाळी बरीच गर्दी असते. लोक योगा आणि मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. एवढ्या गर्दीच्या ठिकाणी देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. देशपांडे हे आपल्या रोखठोक राजकीय मतांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या राजकीय स्टेटमेंटमुळे ते नेहमीच वादात असतात. त्यामुळे त्यांच्या हल्ल्यामागे काही राजकीय धागेदोरे आहेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत.
पूर्वनियोजित कट?
संदीप देशपांडे यांना कोणतंही संरक्षण नव्हतं. मागे त्यांना पोलीस संरक्षण देऊ केलं होतं. पण त्यांनी ते नाकारलं होतं. संरक्षणाशिवायच ते लोकांमध्ये मिसळायचे. त्याचाच फायदा घेऊन हा हल्ला करण्यात आला असावा असं सांगितलं जात आहे. तसेच हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा एक भाग असावा अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
हल्ल्याच्या मनसेकडून निषेध
संदीप देशपांडे यांच्यावर करण्यात आलेला हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी दिली आहे. ज्यांनी कोणी हा हल्ला केला आहे. त्याच्यावर कडक पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. देशपांडे यांनी अनेक प्रकरणावर आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचीही प्रतिक्रीया राजकीय वर्तुळातून उटत आहे.
Leave a comment