बीड | वार्ताहर
भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका अंध महिलेच्या ३ वर्षीय चिमुरडीला खाऊचे अमिश दाखवून उचलून नेत नंतर तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना शहरातील क्रीडांगणाच्या शौचालय परिसरात 21 फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आज बुधवारी पहाटे बीड शहर ठाण्यामध्ये एका अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.
शहरातील स्काऊट भवन येथून भाजी मंडई परिसरात येणाऱ्या रस्त्यावर क्रीडांगणाचे एक प्रवेशद्वार आहे. याच ठिकाणी आरोपींनी भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका अंध महिलेच्या ३ वर्षीय चिमुरडीला खाऊचे अमिश दाखवून उचलून नेत नंतर तिच्याशी कुकर्म केले. पीडित मुलगी मोठ्याने ओरडायला लागली, त्यानंतर हा सर्व प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला त्यामुळे नराधम आरोपींनी तिथून पळ काढला.
वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी
पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उप अधीक्षक संतोष वाळके, पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्यासह फॉरेन्सिक लॅबची टीम घटनाथळी दाखल झाली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत, पीडित चिमुकलीला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.बीड शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.
Leave a comment