डॉ.योगेश क्षीरसागरांच्या आवाहनाला बीडकरांचा मोठा प्रतिसाद
नमस्कार बीडकर...म्हणत अभिनेता भाऊ कदमांची साद
बीड । वार्ताहर
योगेश पर्वातील ऐतिहासिक जन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी शिवप्रेमींचा शिवसागर शिवतीर्थावर अक्षरशः उसळलेला पहावयास मिळाला.या शिवसागरात शिवभक्तांनी भगवे फेटे बांधून आणि भगवा झेंडा हातात घेऊन आकर्षक विद्युत रोषणाईमध्ये छत्रपतींच्या जयघोषाने वातावरण प्रफुल्लित आणि मनमोहक झाले होते.डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बीडकरांनी शिवजन्मोत्सव सोहळयात अलोट गर्दी केली होती.शिव जयंतीच्या निमित्ताने लेझर शो, लेझर लाईट शो आयोजित केला. या कार्यक्रमाला बीडकरांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन दाद देत या सोहळ्याचा मनसोक्त आनंद घेतला. अभिनेता भाऊ कदम यांनी नमस्कार बीडकर म्हणत आपल्या खास शैलीत संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराजांना मानाचा मुजरा करत ‘जय भवानी,जय शिवाजी’ असा जयघोष केला.
आगामी काळात अभ्यासू सुसंस्कृत असणारा चेहरा बीड चं खंबीर नेतृत्व योगेश पर्व च्या माध्यमातून नागरिकांना आनंद आणि समाधान नक्कीच देऊ शकते हे पुन्हा एकदा डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी परत एकदा आपल्या शिस्तबध्द नियोजनातून सिद्ध केले. बीड शहरातील, ग्रामीण भागातील विविध जाती धर्मातील लोकांनी दिवाळी सारखा शिवजन्मोत्सव साजरा केला. अल्पावधीतच तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या डॉ.योगेश भैय्याना तरुणाईने आपल्या अंगा-खांद्यावर उचलून गाण्यांवर ठेका धरला. या दैदिप्यमान शिवजन्मोत्सवातील शिवप्रेमींचा उत्साह पाहून डॉ.योगेश भैय्या देखील त्यांच्यासोबत मनसोक्त थिरकताना दिसले.
यंदाचा शिव जन्मोत्सव ऐतिहासिक आणि दैदिप्यमान बनवण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेत आपल्या अभिनव संकल्पनेतून बीडवासियांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करून यावेळेसची शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करत डॉ. क्षीरसागर यांनी शहरी व ग्रामीण भागातील तमाम शिवप्रेमींची मने जिंकली. डॉ.योगेश क्षीरसागर यांनी आपल्या कुटुंबासह छत्रपती शिवाजी महाराजांना शिवतीर्थावर जाऊन अभिवादन करून जन्मोत्सवाचा प्रारंभ केला. शिवजन्मोत्सव निमित्त डॉ.सारिका क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून चित्र-शिल्प प्रदर्शन महोत्सवाचे आयोजन करून चित्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले.यामध्ये 60 चित्रकारांनी सहभाग नोंदवत 200 चित्र आणि शिल्प प्रदर्शनात ठेवण्यात आले. या महोत्सवात जवळपास सहा ते साडे सहा हजार नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली. .
सेल्फी पाँईट ठरला आकर्षण
शिवप्रेमींना शिवरायांच्या ऐतिहासिक ठेव्यासोबत आपल्या परिवारासह सेल्फी घेण्यासाठी संत तुकारामांच्या सोबतच्या भेटीचा प्रसंग सेल्फी पॉइंटसाठी उभारणी केली होती. या सेल्फी पॉइंट समोर शेकडो कुटुंबांनी सेल्फी घेऊन मनमुराद आनंद घेतला.
Leave a comment