आष्टी । वार्ताहर

खा.डॉ.प्रीतम मुंडे आणि आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत 21 कोटींच्या चार रस्ते कामांना मंजुरी मिळाली आहे. आता लवकरच ही कामे सुरू करण्यात येतील
आष्टी आणि पाटोदा तालुक्यातील जनतेच्या मागणीनुसार दैनंदिन दळणवळण सुसह्य होण्यासाठी रस्ते कामांची आवश्यकता लक्षात घेऊन आ.सुरेश धस यांनी बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांचे कडे सततच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि जनतेच्या या जिव्हाळ्याच्या असलेल्या मागणीस खासदार डॉ.प्रीतम ताई मुंडे यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आष्टी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 561 साबलखेड ते चिंचोली 4.30 कि.मी. किंमत 463. 87 लक्ष.रू  पाटोदा तालुक्यातील... राष्ट्रीय महामार्ग 570 जवळाला फाटा ते पाटोदा 5.30 कि.मी.किंमत 661.11 लक्ष रु. राज्य मार्ग 16 अमळनेर ते निवडुंगा ते चिंचोली कि.मी.6.70  620.52 लक्ष रु कुसळंब ते वानेवाडी ते पारनेर 4.70 कि.मी. किंमत 367.95 लक्ष रु. अशा एकूण चार रस्ते कामांसाठी 21 कोटी 13 लक्ष 45 हजार रु. मंजूर करण्यात आलेले आहेत.

गेल्या अनेक दिवसापासून च्या या दर्जेदार रस्ते व्हावेत अशी या भागातील जनतेची मागणी होती त्यानुसार आमदार सुरेश धस यांनी सतत केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने या कामांना मंजुरी दिली आहे त्यामुळे या चारही कामांच्या परिसरातील गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.