अंबाजोगाई । वार्ताहर
तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील स्त्री रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्या हस्ते नियमित लसीकरण सुविधेची व रक्त साठवण केंद्राची सुरुवात आज झाली. तसेच बिनटाका शस्त्रक्रिया शबिरामार्फत लाभार्थीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
कोविड महामारीच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेले हे रुग्णालय कोविडची लाट संपुष्टात येताच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री रूग्णालय आज सर्व सोयसुविधांनी सूसज्ज रुग्णालय म्हणून अंबेजोगाई परिसरात नावारूपास आले आहे. या ठिकाणी सर्व प्रकारच्या प्रसूती पुर्व, प्रसूती आणि प्रसूती पश्चात सेवा पुरवण्यात येत आहेत. रुग्णांच्या सोयी साठी स्वतः शल्यचिकित्सक यांनी लक्ष देऊन भुल तज्ञ व सोनोग्राफी तज्ञ यांच्या सेवा नियमित पदा व्यतिरिक्त ऊपलब्ध करून दिल्या आहेत.
तसेच स्त्री रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ,भिषक, अस्थिरोग तज्ञ, अश्या सर्व तज्ञ सुविधा 24÷7 उपलब्ध आहेत.आज डॉ साबळे यांच्या उपस्थितीत रक्त साठ केंद्राची आणि नियमित लसीकरणाला सुरुवात केली त्या मुळे आता रुग्णांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी ऊपलब्ध होणार आहेत.रक्त साठवणूक केंद्र व नियमित लसीकरण उद्घाटन डॉ.साबळे सरांच्या हस्ते झाले.या प्रसंगी वैद्यकिय अधिक्षक डॉ अरुणा दहिफळे, स्त्री रोग तज्ञ डॉ. फातेमा, डॉ. नागुरे, डॉ.सायमा,डॉ आदमाने, बालरोग तज्ञ डॉ. प्रसाद , डॉ कौस्तुभ, अस्थीरोग तज्ञ डॉ ओंकार, फिजिशियन डॉ धर्मपाल, यांची प्रमुख उपस्थिती होती.आजचे शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी परिसेविका भट्टे, शिंदे, क्षीरसागर,अधीपरीचारिका सरस्वती, इम्रान, स्वामी, मीरा मुंडे,आशाफंडे, दशरर्थीं, आणि औषध निर्माण अधिकारी आंजने, फड, नरोडे, सुनील जाधव, संगीता परगे, मेनकुदळे तसेच कक्ष सेवक वैभव, सुग्रीव, मुख्तार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
Leave a comment