दै.लोकप्रश्नचे संपादक दिलीपजी खिस्ती  यांच्या पत्रकारितेचा गौरव सोहळा उत्साहात



बीड । वार्ताहर



तीस वर्षे पत्रकारिता करणे हे मोठे आव्हान आहे. पत्रकाराला सामाजिक परिस्थितीचं आकलन स्वतःला होणं आवश्यक आहे.त्यानंतर चांगला पत्रकार घडतो, हे दिलीप खिस्ती यांनी केलं आहे. ही तपश्चर्या आहे. शब्दसारखं तीक्ष्ण हत्यार हाती असताना त्यांनी कोणाला इजा न करता त्यामाध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले असे मत प्रा.डॉ. दिनेश रसाळ यांनी मांडले.



बीड येथील एमआयडीसीतील मॉ वैष्णो पॅलेस येथे दर्पणदिनानिमित्त  दैनिक लोकप्रश्नचे संपादक दिलीप खिस्ती यांच्या 30 वर्षाच्या पत्रकारितेबद्दल गौरव सोहळ्याचे आयोजन 6 जानेवारी रोजी सायंकाळी केले होते.या कार्यक्रमास शिक्षणतज्ञ शेषाद्री डांगे,प्रा.डॉ. दिनेश रसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर खिस्ती यांच्या मातोश्री विजया खिस्ती,पत्नी जयश्री खिस्ती यांची उपस्थिती होती. यावेळी संयोजन समितीने खिस्ती यांचा सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.पुढे बोलताना प्रा. रसाळ म्हणाले ,वर्तमानपत्रात नकारात्मक गोष्टी नसाव्यात हे कर्तव्य संपादक यांचं आहे.समाजाला योग्य दिशा देण्याचं काम त्यांचं आहे.

समाजावर संस्कार करण्याचं काम संपादकांचे आहे.शब्दगांभीर्य हा गुण संपादकांकडे असणे आवश्यक आहे.  शतम वद एकम मा लिख, मा लिख,मा लिख म्हणजे शंभर गोष्टी बोला पण लिखाण करताना जबाबदारी ने करा.अभ्यासपूर्ण लिहा असं आपल्या पूर्वजांच म्हणणं होतं.लेखन हे शस्त्र आहे ते पत्रकारांच्या हातात आहे. त्याचा वापर योग्य झाला पाहिजे.हम पत्रकारोंके अजीब फसाने है,यहा तिर हमे चलाने है और परिंदे भी बचाने है अस काम पत्रकारांच आहे.अस्त्राचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे अस मत दिनेश रसाळ यांनी व्यक्त केले. 



सत्तर वर्ष आम्ही इंग्रजांनी लादलेली शिक्षण पद्धती सुरू ठेवली आहे.कारकून बनवणार शिक्षण आम्ही राबवले. पत्रकार हा जागरूक असतो म्हणून त्याला लोकशाही चा चौथा स्तंभ म्हणतात.2014 साली मोदींनी नेतृत्व स्वीकारलं अन नवं शैक्षणिक धोरण राबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.यासाठी नियुक्त समितीमध्ये एकही राजकीय व्यक्ती नव्हती हे विशेष. देशाचा विचार करणार धोरण आहे हे,तीन वर्षांपासून पुढे पंधरा वर्षेपर्यंत प्रत्येकाला शिक्षण मिळावे हा याचा मूळ उद्देश आहे. अंगणवाडी, बालवाडीमध्ये अभ्यासक्रम निश्चित केला.पूर्व प्राथमिक शिक्षण ला प्राधान्य दिलं गेलं.

अनुभवातून शिक्षण हे धोरण आहे.शिक्षणात भारतीयता आणण्याचा निर्णय घेतला.नवं शैक्षणिक धोरण लोकांपर्यंत पोहचवण्याच काम माध्यमांच आहे.देशात अकरा हजार संस्था पदव्या वाटतात.शिक्षकांचा सन्मान करण्याऐवजी आम्ही त्याला शिक्षण सेवक केलं.हे दुर्दैवी आहे.नव्या धोरणात शिक्षकांना सन्मान दिला आहे.कौशल्य विकास झाला पाहिजे यावर लक्ष केंद्रित केले आहे.सगळ्या समस्यांच उत्तर या धोरणात आहे. मात्र या विषयावर राजकारण सुरू आहे.यासाठी लोकांचं प्रबोधन व्हावं ही जबाबदारी पत्रकारांची आहे ,असे मत शेषाद्री डांगे यांनी व्यक्त केले.



प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत असावं हे या धोरणाच वैशिष्ट्य आहे. त्रिभाषीय व्यवस्था निर्माण होणार आहे.सर्वंकष मूल्यांकन पद्धती यामध्ये असणार आहे. पत्रकार आणि शिक्षक एकत्र आले तर देशात क्रांती घडेल अस सांगत त्यांनी पत्रकारांनी या धोरणाबाबत जागरूकता आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. या सत्काराला उत्तर देताना दिलीप खिस्ती सर यांनी आपल्या तीस वर्षाच्या प्रवासाचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. पत्रकारिता करताना सामाजिक प्रश्नांची जाण अन् भान ठेवून काम केलं. तीस वर्षात आपल्याला कोणी वाईट म्हणू नये याची काळजी घेतली.

पत्रकारितेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात पाऊल ठेवले. सातत्य,सचोटी राखण्याच काम मी नेहमी केलं.पत्रकारितेत पावित्र्य अन चारित्र्य राखण्याच काम मी केलं आहे अस मत त्यांनी मांडले. या कार्यक्रमाला आ. संदिप क्षीरसागर, माजी आ सुनील धांडे, माजीमंत्री बदामराव पंडित,माजी आ सय्यद सलीम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यासह राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.