बीड । वार्ताहर
व्यापारी महासंघ कॅटचे मराठवाडा अध्यक्ष तथा बीड जिल्हा अध्यक्ष संतोष सोहनी यांनी आपला वाढदिवस गेवराई येथील बालग्राम आश्रमातील मुलासोबत साजरा केला. सामाजिक दायित्व सांभाळत संतोष सोहनी यांनी येथील 137 मुलं मुलींना कपडे देऊन एकप्रकारे मदत केली बालग्राम मधील सर्व अनाथ ऊसतोड मजुराची मुले सांभाळली जातात त्यांना शालेय ड्रेस देऊन त्याच्या सोबत वाढदिवस साजरा केला.
पारी महासंघ कॅटचे मराठवाडा अध्यक्ष तथा बीड जिल्हा अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष सोहनी यांच्या वाढदिवसानिमित्त विहान प्रकल्प,व्यापारी महासंघ ,पोलीस मित्र आणि पत्रकार मित्राच्या संयुक्त सहकार्याने एचआयव्ही बाधित 22 जोडप्यांचे विवाह लावून देण्याचा संकल्प करण्यात आला होता. या सामाजिक उपक्रमासोबतच संतोष सोहनी यांनी 30 डिसेंबर रोजी गेवराई येथील बालग्राम या अनाथालयातील 137 मुले आणि मुली याना शालेय गणवेश दिले यावेळी संतोष सोहनी यांच्या समवेत बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, पत्रकार अशोक वाणी ,गेवराई तालुका महेश्वरीचे अध्यक्ष आणि व्यापारी संघटनेचे सागर भुतडा आदी उपस्थित होते. अनाथ आणि ऊसतोड कामगाराच्या पाल्याला मदत दिल्याने आपल्याला आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सोहनी यांनी व्यक्त केली.
Leave a comment