बीडकरांसाठी विविध कार्यक्रमाची मेजवानी
बीड | वार्ताहर
साहित्य,नाट्य,कला,क्रीडा यासह सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असणाऱ्या संस्कार भारतीच्या वतीने देवगिरी प्रांताचा कलासाधक संगम 2022 हा कार्यक्रम येत्या 23 ते 25 डिसेंबर 2022 दरम्यान राजयोग मंगल कार्यालय,आशा टॉकीज जवळ ,बीड येथे होत आहे.जळगाव ते लातूर अशा 14 जिल्ह्यातील देवगिरी प्रांताचे जवळपास एक हजार कलासाधक या तीन दिवसीय सोहळ्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे उदघाटन आज शुक्रवारी सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध सिनेअभिनेते योगेश सोमण यांच्या हस्ते होणार आहे.
संस्कार भारती बीड शाखेच्या वतीने गेल्या 25 वर्षांपासून कंकालेश्वर महोत्सव, दीपोत्सव, गुरू पौर्णिमा सारखे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात.तब्बल दहा वर्षानंतर होणाऱ्या कलासाधक संगमच्या आयोजनाची संधी यावेळी बीडकरांना मिळाली आहे.नाट्य,कला,साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी या निमित्ताने बीड करांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ बीड करांनी घ्यावा असे आवाहन संस्कार भारती चे कलासाधक संगम 2022 चे महाव्यवस्थापक प्रमोद वझे आणि समितीने केले आहे.
Leave a comment