रविवारी परभणी येथे वितरण
बीड | वार्ताहर
सोमेश्वर साथी लोक निर्माण राष्ट्रीय पुरस्कार 2022 बीड येथील पत्रकार अविनाश वाघीरकर यांना जाहीर झाला असून रविवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी परभणी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वितरित होणार आहे.
गेल्या वीस वर्षापासून पत्रकारितेमध्ये कार्यरत असलेले अविनाश व वाघिरकर यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेऊन सोमेश्वर साथी लोकनिर्माण राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे रविवार 20 नोव्हेंबर रोजी परभणी येथील सिटी पॅलेस येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एकता संस्थेचे राज्य कार्याध्यक्ष अरूण मराठे अतिथी म्हणून अभिनेते अनिल मोरे, महापौर प्रताप भैय्या देशमुख, परळी औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड, डॉ. वर्षा पुनवटकर आदींची उपस्थिती राहणार असल्याची माहीती अजमत खान, संपादक बालासाहेब फड यांनी दिली.
Leave a comment