बीड | वार्ताहर

 

सन २०१२ पासून भारतीय अस्थिरोग संघटना, प्रतिवर्षी ४ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर अस्थि व सांधे आरोग्य दिन (Bone and Joint Day) साजरा करत असते. प्रतिवर्षी १ते ७ ऑगस्ट, संपूर्ण देशभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. 

 

२०२२ यावर्षी साठी भारतीय अस्थिरोग संघटना प्रत्येकाने रस्ते अपघातातील एक जीव वाचवावा (each one Save one) ही थीम राबवणार आहे. 
भारतामध्ये रस्त्यांवरील अपघातात जाणाऱ्या बळींची संख्या रोखणे हा मुख्य उद्देश आहे. २०१८ च्या जागतिक आकडेवारी नुसार १९९ देशांपैकी रस्ते अपघात मधील बळींची आकडेवारीनुसार भारत देश प्रथम क्रमांकावर आहे. आपल्यानंतर चीन आणि अमेरिका यांची आकडेवारी आहे.
२०१९-२०च्या आकडेवारीनुसार भारतातील संपूर्ण राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात एकूण ४,४९,००२  एवढ्या अपघातांची नोंद आहे. यापैकी १,५१,११३ लोकांना आपला जीव गमवावा लागला. ४,५१,३६१ लोकांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या.

 

१८ ते ४५ वर्ष वयोगटाच्या तरुण रुग्णांचे अपघात ग्रस्त होण्याचे प्रमाण ६९.३ टक्के आहे. १८ ते ६० या काम करणाऱ्या ग्रुप मधील लोकांचे अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण ८४.३ टक्के इतके जास्त आहे. रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या मध्ये ८६ टक्के पुरुष  आहेत, जे बऱ्याच वेळा कुटुंबाचा एकमेव उत्पन्नाचा स्त्रोत असतात.  
यातील बरेचसे मृत्यू अपघातानंतर तातडीची वैद्यकीय मदत , अपघातानंतर पहिल्या तासात ( गोल्डन आवर) मध्ये न मिळाल्यामुळे झालेले आहेत. यातील बरेचसे मृत्यू अपघातानंतर योग्य प्रकारचे प्रथम उपचार दिल्यानंतर टाळता येऊ शकतात. परंतु,‌सध्या, अशा प्रकारच्या जीवन रक्षक प्रथमोपचार व मदतीच्या प्रशिक्षणाचा खूपच अभाव दिसून येतो. अशा प्रथमोपचारांचे प्रशिक्षण आपण अनेक तरुण, विद्यार्थी, पोलीस यांना सहजरीत्या देऊ शकतो. 

 

आम्ही महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेच्या वतीने,‌असे जीवन रक्षक व प्रथमोपचार प्रशिक्षण, महाराष्ट्रभरातील  हजारो विद्यार्थी पोलीस व तरुणांना देण्याचे ठरवले आहे. 
१ ते ७ ऑगस्टदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे सदस्य असे प्रशिक्षण देणार आहेत. तसेच संपूर्ण देशभर देखील भारतीय अस्थिरोग संघटना असे प्रशिक्षण देणार आहे. . संपूर्ण देशभर लाखो जीवन रक्षक तयार करण्याचा संघटनेचा मानस आहे. या प्रशिक्षणाची लिम्का बुक मध्ये रेकॉर्ड नोंदविण्याचा मानस आहे.
यासोबतच आपली हाडे आणि स्नायू बळकट ठेवण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे.अशी माहिती  महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे डॉ.वासुदेव गाडेगोने अध्यक्ष, डॉ. एन जे कर्णे, सचिव, डॉ.प्रमोद शिंदे, राज्य उपाध्यक्ष तसेच  बीड येथील शाखेचे अध्यक्ष डॉ.प्रवीण देशमुख सचिव डॉ.सुरेश मुंडे यांनी दिली आहे.सर्व अस्थिरोग तज्ञ या प्रशिक्षिनात सहभागी होऊन सहभाग नोंदवणार आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.