खिसेकापू तरुणाविरुध्द गुन्हा दाखल
तेलगाव । वार्ताहर
येथील बसस्थानकातून बसमध्ये बसण्यासाठी जाणार्या एका प्रवाशाच्या खिशातील तब्बल 1 लाखांची रक्कम खिसेकापूने गर्दीचा फायदा घेवून चोरली. संबंधित खिसेकापू तरुणाविरुध्द दिंद्रुड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.22 जुलै रोजी सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
भारत महादेव माने (56,रा.शिंदेवाडी,पात्रुड ता.माजलगाव) हे प्रवाशी तेलगाव येथून दिंद्रुडला जाणार्या बसमध्ये चढत होते. या दरम्यान आरोपीने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील 1 लाख रुपयांची रक्कम काढून घेतली. या प्रकरणी भारत माने यांच्या फिर्यादीवरुन आरोपी किरण भास्कर पवार (20,रा.सागर कॉलन,पाथरी,जि.परभणी) याच्याविरुध्द दिंद्रुड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोह.खेत्रे पुढील तपास करत आहेत.
Leave a comment