अतिवृष्टी व पावसामुळे 20 रोजीची परीक्षा केली रद्द

 

बीड । वार्ताहर

राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरसदृश्य स्थिती बहुतांश ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणा-या अडचणी तसेच विद्यार्थी हित त्यांची सुरक्षा लक्षात घेता पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) 2022 परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी याबाबत पत्रकाव्दारे सर्व संबंधितांना माहिती दिली आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8 वी) ही दि.20 जुलै 2022 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होती असे यापूर्वी प्रसिध्दीपत्रकान्वये जाहिर करण्यात आले होते. तथापि सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरसदृश्य स्थिती बहुतांश ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणार्‍या अडचणी तसेच विद्यार्थी हित त्यांची सुरक्षा लक्षात घेता सदर परीक्षा दि.20 जुलै 2022 ऐवजी दि. 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येईल. यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दि. 31 जुलै 2022 च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. असेही राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्या वतीने जारी करण्यात आले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.