बंकटस्वामी महाराजांच्या संगती मध्ये महाराष्ट्रातील शेकडो दिगग्जरत्न घडले - महंत लक्ष्मण महाराज मेंगडे
वै.बंकटस्वामी मुळे बीड जिल्ह्यात परमर्थिक श्रीमंती- माजी जयदत्त क्षीरसागर
बंकटस्वामी महाराज सर्वांचे श्रद्धास्थान -आ. विनायक मेटे
नेकनूर। मनोज गव्हाणे
वारकरी संप्रदायातिल भक्ती सूर्य महान संत वै बंकटस्वामी महाराज यांच्या ७८ व्या पुण्यतिथी उत्सवाची मंगळवारी दुपारी काल्याच्या कीर्तनांने थाटात सांगत झाली. सकाळी समाधी अभिषेक करण्यात आला तर दुपारी ११ ते २ या वेळेत श्री ह भ प गु महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन संपन्न झाले. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक भक्तांनी उपस्थिती लावली होती
यात प्रमुख संत महंत उपस्थिती महंत महादेव महाराज चाकरवाडीकर, ह भ प हरिहर भारती महाराज, श्री ह भ प रामहरी महाराज डंबरे, श्री ह भ प रतन महाराज सासुरेकर श्री ह भ प नवनाथ महाराज जरुड, श्री ह भ प मारुती महाराज चोरमले, श्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज पिसे, शेकडो महाराज मंडळी सह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
तर राजकीय उपस्थिती, माजी मंत्री, जयदत्त क्षीरसागर , आमदार विनायकरावजी मेटे, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अशोक लोढा,अरुण नाना डाके, नानासाहेब काकडे पाटील, दिनकरराव कदम, भारतबप्पा काळे ,दादाराव काळे नारायण शिंदे, अनिल जाधव यांच्या सह बंकटस्वामी संस्थान चे सर्व विश्वस्त उत्सव कमेटी नेकनूर पंचक्रोशी व हजारो भाविकांची उपस्थिती होती.
श्री क्षेत्र नेकनूर येथे महान संत बंकटस्वामी पुण्यतिथी उत्सवात काल्याचे किर्तन पुष्प गुंफताना श्री ह भ प महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, यांनी गवळणी पर अभंगावर चिंतन मांडले
तुझी संगती। झाली आमुची निश्चिती।।
नाही देखीले ते मिळे। भोग सुखाचे सोहळे।।
घरी ताकाचे सरोवर।येथे नवनीता चे पूर।।
तुका म्हणे आता। आम्ही नवजो दवडिता।।
या अभंगावर सुंदर चिंतन मांडले यावेळी माणसाच्या जीवनामध्ये संगती अतिशय महत्त्वाचची आहे.संगतीमुळे माणूस मोठा होतो.तसेच संगतीमुळे माणूस लहान होतो. संताच्या संगती मध्ये आल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते त्यामुळे सत्संग प्रयत्नपूर्वक करावा.सज्जनांची संगती असावी. जीवाने संगती देवाची आणि संतांची करावी. संत बंकट स्वामी महाराज यांच्या संगती मध्ये महाराष्ट्रातील शेकडो दिग्गजरत्न घडले. स्वातंत्र्यपूर्व काळात संपूर्ण महाराष्ट्रभर वारकरी कीर्तनाची पताका घराघरात घेऊन जाण्याचे सर्वस्वी श्रेय जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था व बंकट स्वामी महाराजांना जाते असे महाराजांनी सांगितलं..
कालाच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या गोकुळातील मधील मथुरेतील लीला सांगितल्या तसेच श्री गुरु बंकटस्वामी महाराज यांच्या चरित्रातील काही आठवणी सांगितल्या
स्वामीचे वारकरी संप्रदायावर खूप मोठे उपकार आहेत असेही महाराज यांनी सांगितले. ग्रामीण भागात घराघरात परमार्थ घेऊन जाण्याचे खुप मोठं काम स्वामी नी केले.स्वामी महाराज उचिष्ट महाराष्ट्रतील वारकरी संप्रदाय आहे. वारकरी कीर्तनात अभंग निरूपणाची पध्दत स्वामी नी विकसित केली.त्या स्वामीचे खुप मोठे आशीर्वाद आहेत.
यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बंकटस्वामी महाराजामुळेच बीड जिल्ह्यात पारमार्थिक श्रीमंती आहे. असं प्रतिपादन केलं, तर बंकट स्वामी महाराज हे सर्वांचे गुरु आहेत पवित्र श्रद्धास्थानांचा आणि देवस्थानांचा विकास करणे ही पुढाऱ्यांची जबाबदारी आहे. राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्रित येऊन समाजाची क्रांती होऊ शकते असं विनायक मेटे यांनी सांगितले.. सामाजिक क्रांती मध्ये बंकट्स्वामी यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे.त्यांच्या दर्शनाने आज पुनीत झालो असं नंदकिशोर मुंदडा म्हणाले. बंकटस्वामी महाराजांच्या आशीर्वादामुळेच माऊली संस्थान आहे. स्वामींच्या पुण्यतिथी उत्सवात सेवक म्हणून आलो असं महादेव महाराज चाकरवाडी कर यांनी सांगितले..
या कार्यक्रमास अनेक मान्यवर मंडळीनी हजेरी लावली होती सर्व मान्यवरांचे आभार संस्थान वतीने मानण्यात आले श्री गुरु बंकट स्वामी महराज यांची फडावरील सर्व गुणवान पैकी श्री ह भ प नाना महाराज कदम श्री ह भ प सुरेश महाराज जाधव. श्री ह भ प सत्यवान महाराज लाटे, श्री ह भ प रंजीत महाराज शिंदे श्री ह भ प दिनेश महाराज काळे, श्री ह भ प अरुण महाराज कदम श्री ह भ प अभिमान महराज ,अचूत महाराज घोड्के ,ओंकार महाराज, मंगेश महाराज, रामेश्वर महाराज दराडे अनिल महराज, मंगेश महाराज,जनार्दन महराज बांगर .अर्जुन महाराज , वसंत महाराज, आदिंची उपस्थिति होती,तसेच हजारो च्या संख्येने भाविक भक्ति व बंकट स्वामी महाराज फडावरील सर्व टाळकरी उपस्थित होते शेवटी काल्याच्या अभंग म्हणून दही हंडी फोडुन माहप्रसाद वाटप करण्यात आला ,हजारो च्या पंगतीत मध्ये बूंदी आणि मसाले भात याचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.
1)सप्ताहामध्ये महाप्रसाद 60 पोते साखर ,15 क्विंटल दाळ तर तेल 15 टाकी आणि 15 क्विंटल तांदूळ, यामुळे हजारो भाविक भक्तगण प्रसाद घेवुन तृप्त झाले यामधे बऱ्याच भाविक भक्तांनी जार च्या थंडगार पाण्याची व्यवस्था केली होती.
2) महापंगत वाढण्याचे महत्वाचे काम नेकनूरच्या महिलां मंडळांनी केले.यामुळे प्रत्येकाला महाप्रसाद वेळेवर मिळाला.विशेष म्हणजे.1000 महिलांनी हें काम पार पाडलें.
3) वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व श्री ह भ प रतन महाराज सासुरे कर यांच्या शताब्दी निमित्त नेकनूर संस्थानच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
4) नेकनूर मधील गणेश मंडळाच्या तरुण मंडळानी पार्किंग, पाणी, स्वच्छता, सुरक्षा, सर्व चोख व्यवस्था करण्यासाठी मोठी मेहनत घेतली.अन्नदान कमेटीने सर्वांनां मार्गदर्शन केले.
5) या उत्सवात दहा हजार झाडे लागवडीचा संकल्प,अवयव दान, रक्तदान शिबीर, सर्व रोग निदान शिबीर, आदी विधायक उपक्रम राबवण्यात आले.तसेच दुष्काळात शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शन केल,पाणी,माती आणि पिके या बाबतीत अनमोल मार्गदर्शन लाभले.बंकटस्वामी महाराज यांच्या चरित्राचे प्रकाशन मान्यवर मंडळीच्या हस्तेकरण्यात आले.
नेकनूर येथे भव्य अखंड हरीनाम सप्ताहात काल्याचे कीर्तन करताना श्री ह भ प महंत लक्ष्मण महाराज मेंगडे हजार च्या संख्येने भाविक भक्ति,महिला ,पुरुष उपस्थिति होते
दही हंडी फोडताना मान्यवर..
वै.बंकटस्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त येणाऱ्या भक्तांना वाटेत घरासमोर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रिक्षाचालक सय्यद मसरत आणि त्यांच्या कुटुंबियांनी करत निनगुरच्या नेकी चा संदेश दिला.या ठिकाणी मठाचे मठाधिपती ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे थांबले होते .
Leave a comment