विना गणवेश ड्युटी करणारे 12 कर्मचारी निष्पन्न
विनातिकिट प्रवास करणार्या प्रवाशाला दंड
बीड । वार्ताहर
शासनात विलिनीकरणासाठी संपावर गेलेले सर्वच कर्मचारी आता पुन्हा कर्तव्यावर परतले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी बसफेर्या सुरु झाल्या असून या फेर्यांना चांगला प्रतिसादही मिळू लागला आहे. असे असतानाच विनातिकिट प्रवास करणारे प्रवाशी तसेच पैसे घेवून प्रवाशांना त्याचे वाहक तिकिट देतात का? याबरोबरच गणवेशात कर्तव्यावर कर्मचारी हजर राहतात का? या सार्या बाबी तपासणीसाठी बीड जिल्ह्यातील 8 आगारातील विविध मार्गावर एकाच दिवशी एसटी बसेसची विशेष मार्ग तपासणी पथकांकडून तपासणी करण्यात आली. यात काही ठिकाणी गैरप्रकार आढळून आले. त्यांच्यावर कार्यवाही केली असल्याची माहिती विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी दिली.
जिल्ह्यातील बीड, परळी,धारूर ,माजलगाव, गेवराई, पाटोदा ,आष्टी ,अंबाजोगाई या आठही आगारात 30 एप्रिल रोजी एकाचदिवशी भरारी पथकांकडून तपासणी करण्यात आली. या तपासणीत पैसे घेवून तिकिट दिले नाही असे 1 प्रकरण आढळून आले. तसेच कमी दराची तिकिटे दिल्याचे 1 प्रकरण आढळून आले. याबरोेबरच विनामूल्य विनातिकीट प्रवास करणारा 1 प्रवाशी आढळून आला. महत्वाचे हे की, कर्तव्यावर असतानाही 12 वाहक-चालक गणवेशात नव्हते. जिल्ह्यात 6 पथकांकडून ही तपासणी मोहिम हाती घेण्यात आली होती. पथकात एकूण 11 अधिकारी सहभागी होते तर 18 पर्यवेक्षकीय कर्मचार्यांचाही समावेश होता. आठ आगारातील 48 मार्गावर 214 एसटी बसेस तपासण्यात आल्या. एका कारवाईत 135 रुपयांचा प्रवास भाडे दंड आकारण्यात आला. दरम्यान सदर विशेष तपासणी कार्यक्रमांतर्गत विभागांतर्गत शनि अमावस्या निमित्त श्री क्षेत्र चाकरवाडी व श्री क्षेत्र राक्षसभुवन येथे होत असलेल्या जादा वाहतुकीचे नियोजन सुध्दा संबंधित पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी पार पाडले अशी माहिती विभाग नियंत्रक मोरे यांनी दिली. या विशेष तपासणीमुळे बेशिस्त कर्मचार्यांसह विनामूल्य प्रवास करणार्यानाही योग्य तो संदेश गेला आहे.
Leave a comment