पुणे | वार्ताहर
महाराष्ट्र अस्थिरोग संघटना प्रतिवर्षी १ मे हा संघटनेचा स्थापना-दिवस म्हणून साजरा करते. तसेच १ ते ७ मे यानिमित्त अस्थिरोग व आरोग्य याबद्दल जनजागरण सप्ताह साजरा करते. यावर्षी या अभियानाची मुख्य थीम लव्ह फिटनेस अँड प्रिव्हेन्ट ऑर्थोपेडिक डिसीजेस अर्थात शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त रहा आणि हाडांचे आजार टाळा ही आहे. या भूमिकेतून आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
१ मे रोजी औरंगाबाद येथे एम-ओ-ए डे स्थापना दिनानिमित्त उद्घाटन कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. वासुदेव गाडेगोने, सचिव डॉ.नारायण कर्णे, उपाध्यक्ष डॉ.प्रमोद शिंदे ,सर्व राज्य कार्यकारणी सदस्य तसेच औरंगाबाद अस्थिरोग डॉ. संघटनेचे डॉ.यशवंत गाडे, डॉ.सारंग देवरे,डॉ. संतपुरे शिवकुमार,डॉ. मारुती लिंगायत, डॉ धुळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. तसेच आठवडाभर राज्यभरातील संघटनेच्या सर्व सदस्य व रुग्णांच्या जनजागरणासाठी, राज्यभरातील मान्यवर डॉक्टर व विशेष तज्ञ यांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.डॉ.सुनील मारवाह,डॉ. पराग संचेती,डॉ.विजय काकतकर,डॉ. जॉन एब्नेजार, डॉ. एन जे कर्णे, योगी सत्यानंद,डॉ.राजेंद्र अभ्यंकर,डॉ. मिलिंद पत्रे, डॉ. शैलेश पानगावकर, डॉ. राहुल झांजुरणे,डॉ. श्रीकांत ताम्हाणे इत्यादी ज्येष्ठ मान्यवरांचे मार्गदर्शक व्याख्यान होणार आहे.
राज्यभर रुग्णांच्या जनजागरण अभियान, मार्गदर्शन, वृत्तपत्रात लेखाद्वारे, तसेच स्थानिक क्लब मध्ये मार्गदर्शक व्याख्यान, शिबिरे इ. भरगच्च कार्यक्रम केलेले आहेत. सदर कार्यक्रमाचा उद्देश रुग्णांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती अर्थात फिटनेस वाढवून विविध अस्थिरोग टाळण्यासाठी व आरोग्यदायी जीवन शैली वाढवण्यासाठी नक्कीच उपयोग होणार आहे. या सर्व अभियानात सर्वांनी सहभाग नोंदवून लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र अस्थीरोग संघटना पदाधिकारी अध्यक्ष डॉ. वासुदेव गाडेगोने, सचिव डॉ.नारायण कर्णे, उपाध्यक्ष डॉ.प्रमोद शिंदे सर्व राज्य कार्यकारणी सदस्य यांनी केली आहे.
Leave a comment