रविवारी बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत
ग्रामसभेतून मोहीम जाहीर करणार- जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे
बीड । वार्ताहर
केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्डचे केसीसी उपलब्ध करून देण्याबाबतची विशेष मोहीम सुरू केली आहे. सदरील मोहीम ही भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून देशात राबविण्यात येत आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत 24 एप्रिल ते 1 मे या कालावधीत किसान भागीदारी प्राथमिकता हमारी नावाची मोहीम राबवली जाणार आहे. या अनुषंगाने 24 एप्रिल रोजी बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करून सदरील योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली.
बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये 22 एप्रिल रोजी सकाळी 11:30 वाजता प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमे संदर्भात विशेष _पत्रकार परिषद_ संपन्न झाली.या पत्रकार परिषदेला जिल्हा अग्रणी अधिकारी श्रीधर कदम, जिल्हा विकास प्रबंधक नाबार्ड तात्यासाहेब मारकड, आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषदचे डॉ. वि.भा.देशमुख यांची उपस्थिती होती. अधिक माहिती देताना प्र.जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे साहेब म्हणाले, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांनी वेगवेगळ्या वित्तीय संस्था बँकांकडून जवळपास 2 लाख 90 हजार 11 लाभार्थी या शेतकर्यांना पीक कर्ज पुरवठा करण्यात आलेला आहे. कोणत्याही वित्तीय संस्था तसेच बँकेकडून पीक कर्ज घेतलेले अद्यापही 2 लाख 34 हजार 278 शेतकरी बांधव वंचित आहेत. या शेतकर्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत जास्तीत जास्त पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या किसान भागीदारी प्राथमिकता हमारे या मोहिमेअंतर्गत जून अखेरपर्यंत त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच शेतकर्यांना सुटसुटीत व सोप्या पद्धतीने अर्ज दाखल करता यावा यासाठी एक पानी अर्जाचा नमुना सर्व बँकांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसेच परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्र सह प्राप्त झाले पासून आठ दिवसांमध्ये शेतकर्यांना बँकामार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून केसीसी उपलब्ध करून देण्यात येईल. याअंतर्गत कृषी, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायासाठी क्रेडिट कार्ड शेतकर्यांना मिळणार आहे. ज्या लाभार्थी शेतकर्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत अद्याप कोणत्याही वित्तीय संस्था व बँकाकडून कर्ज घेतलेले नाही अशा शेतकर्यांनी या विशेष मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले आहे.
Leave a comment