आष्टी । वार्ताहर
भरधाव कारने रस्त्याने जाणार्या वृध्दाला पाठीमागून जोराची धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या वृध्दाचा मृत्यू झाला. 20 मार्च रोजी तालुक्यातील देविनिमगाव येथे कडा-आष्टी रस्त्यावर हा अपघात घडला.
काशिनाथ यशवंता डाळींबकर (रा.देविनिमगाव,ता.आष्टी) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी मयताचा मुलगा विठ्ठल डाळींबकर यांच्या फिर्यादीवरुन कार क्र.(एम.एच.42 ए.वाय.3480) च्या चालकाविरुध्द आष्टी ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरला म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला.पो.ना.काळकुटे अधिक तपास करत आहेत.
Leave a comment