शिवसेना कायम पाठीशी असल्याचा दिला शब्द

 

बीड | वार्ताहर

बीड येथील कट्टर शिवसैनिक कै. सुमंत रुईकर यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचे आज सबंध महाराष्ट्राने पुन्हा एकदा पाहिले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत रुईकर यांच्या बीड येथील घराचे भूमिपूजन जिल्हा शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.याप्रसंगी सुमंत रुईकर यांच्या पत्नी कीर्ती रुईकर, मुलगी ऐश्वर्या आणि मुलगा आर्यन तसेच रुईकर कुटुंबीय उपस्थित होते. शिवसेनेने दिलेल्या या मोठ्या आधारामुळे आम्ही कायम शिवसेनेचे आभारी आहोत अशा भावना कीर्ती रुईकर यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केल्या.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो  यासाठी कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर आणि त्यांचा एक मित्र यांनी बीड ते तिरुपती बालाजी पायी यात्रा केली होती. कर्नाटकमध्ये पोहोचल्यानंतर रुईकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने रुईकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. घरातील कर्ता पुरुष गेल्याने रुईकर कुटुंबीय एकाकी पडले होते; मात्र शिवसेना कडवट शिवसैनिक सुमंत रुईकर यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिली.

सुमंत रुईकर यांच्या कुटुंबियांच्या बीड येथील धोंडीपुरा, सराफा रोड भागातील घराचे भूमिपूजन आज रविवारी (दि.२३) शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑनलाइन उपस्थितीत  करण्यात आले. या प्रसंगी बीड जिल्हा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज रविवारी (दि.२३) दुपारी दीड वाजता सुमंत रुईकर यांच्या घराचे श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले.

 

 

शिवसेना कायम रुईकर कुटुंबियांच्या पाठीशी-मंत्री एकनाथ शिंदे

 

याप्रसंगी रूईकर कुटुंबियांशी संवाद साधताना मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेना कायम तुमच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे. यापुढे कोणतीही अडचण आली तरी शिवसेनेशी संपर्क साधा, आम्ही कायम तुमचे भाऊ म्हणून पाठीशी असू असा शब्दही त्यांनी दिला .तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना ही रुईकर कुटुंबियांच्या पाठीशी कायम राहण्याचा सूचना मंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी दिल्या. या घराचे भूमिपूजन जितक्या तत्परतेने झाले त्याच पद्धतीने आता या घराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे असे आवाहनही मंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी केले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.