सीएस डॉ.सुरेश साबळेंच्या हस्ते मातेला बुडित मजुरीची रक्कम वितरित
बीड । वार्ताहर
बीड जिल्हा रुग्णालयात बीड येथील पौष्टिक पुनर्वसन केंद्र अर्थात एनआरसी विभागात 12 ऑक्टोबर रोजी आडीच वर्षाचा कुपोषित बालकास दाखल करण्यात आले. सदरील कुपोषित बालकास चौदा दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर रोजी सुट्टी देण्यात आली.उपचारादरम्यान बालकाचे वजन दिड किलोने वाढले आहे. रुग्णांच्या पालकास प्रत्येक दिवसाचे 300 रु.प्रमाणे एकूण 14 दिवसाचे 4200 रुपये बुडीत मजूरी प्रत्यक्ष वाटप जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांचे हस्ते वाटप करण्यात आले. रुग्णांच्या आईने रुग्णांला योग्य उपचार भेटल्याबददल तसेच प्रत्येक्ष लाभ दिल्याबद्दल जिल्हा रुग्णालयाचे आभार व्यक्त केले.
कुपोषित बालकावर यशस्वी उपचार करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे,एनआरसी वैद्यकिय अधिकारी डॉ.संध्या हुबेकर,बालरोग तज्ञ डॉ.राम देशपांडे, परिसेविका श्रीमती मेघा जाधव,आहार तज्ञ श्रीमती सवित्री कचरे आदींनी परिश्रम घेतले.जिल्हा रुग्णालयात कुपोषित बालकास उपचारासाठी एनआरसी विभाग कार्यान्वीत आहे. सदरील विभागात दाखल झालेल्या बालकास योग्य आहार व उपचार पुरवला जातो तसेच बालकाबरोबर राहणार्या पालकास मोफत आहार व बुडीत मजूरी म्हणून दररोज 300 रु. इतका प्रत्यक्ष लाभ दिला जातो.त्यामुळे जिल्हाभरातील तीव्र कुपोषित बालकांना जिल्हा रुग्णालय,बीड येथे कार्यान्वीत असलेले पौष्टिक पुनर्वसन केंद्र (एनआरसी विभाग) येथे दाखल करुन त्यांच्यावर योग्य उपचार करुन घ्यावेत असे आवाहन एनआरसी विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी केले आहे.
Leave a comment