बीड । वार्ताहर
बीड जिल्हयातील विविध गुन्ह्यातील जप्त किंमती मुद्येमाल 23 ऑक्टोबर रोजी तीन फिर्यादींना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. फिर्यादीस मुद्येमाल सन्मानपुर्वक परत करण्याची प्रक्रिया वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पो.नि. सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. नारायण जाधव आणि कार्यालयातील पोह.अनिल मिसाळ यांनी पुर्ण केली.
विविध गुन्ह्यातील जप्त मुद्येमाल निर्गती करण्यासाठी पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या आदेशाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने 20 ऑक्टोबरपासून अपर पोलीस अधीक्षक सुनील लाजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे स्तरावरील प्रलंबीत किंमती मुद्देमाल यांची माहिती घेऊन फिर्यादींना संपर्क करुन त्यांच्यामार्फत न्यायालयाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर मुद्येमाल फिर्यादीस परत केला जात आहे. त्यामध्ये 23 ऑक्टोबर रोजी ही प्रक्रिया पुर्ण करुनसन्मानपुर्वक फिर्यादीस अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या हस्ते परत करण्यात आला.
यात परळी ग्रामीण ठाणे हद्दीतील एका गुन्ह्यातील मंगळसुत्रातील आठ मणी आठ हजारांचा माल अशोक शामराव अंधारे (रा.दादाहरी वडगांव) यांना देण्यात आला. नेकनूर ठाणे हद्दीतील कलम 392 भादंविमधील पंधरा हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम सोन्याची अंगठी गणपत प्रभु तागड, (रा. लिंबागणेश ता. बीड) यांना परत करण्यात आली. तसेच शिरुर ठाणे हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने, मणिमंगळसुत्र, सोन्याची नथ व नगदी 4 हजार रु.असा 24 हजारांचा ऐवज राजाराम भिमराव जोगदंड (रा.कमळेश्वर धानोरा,ता.शिरुर) यांना देण्यात आला.
Leave a comment