गरजू नागरिकांनी सहभाग नोंदवावा-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांचे आवाहन
बीड । वार्ताहर
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी यांचे मार्फत पॅन इंडिया लिगल अवेअरनेस प्रोग्रामतंर्गत उद्या दि. 23 ऑक्टोबर 2021 रोजी शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडागंणावर महाशिबीर आयोजीत करण्यात आले. या महाशिबीरात जिल्हा रुग्णालयातर्फे 7 स्टॉल लावले गेले आहेत. या माध्यमातून असून विविध 15 योजनांचा लाभ दिला जाणार आहे. तसेच विविध योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ शिबीरात दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . सुरेश साबळे यांनी दिली आहे. गरजू नातेवाईकांनी कोविड नियमांचे पालन करुन सहभाग नोंदवावा असे आवाहनही डॉ.सुरेश साबळे यांनी केले आहे. दरम्यान शुक्रवारी महाशिबीर ठिकाणची जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी व यंत्रणेतील अधिकार्यांनी पाहणी केली.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय यु.ललित यांच्यासह इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
उद्या शनिवारी बीड येथे भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी यांचे मार्फत पॅन इंडिया लिगल अवेअरनेस प्रोग्रामतंर्गत महाशिबीर पार पडणार आहे. यात जिल्हा रुग्णालयाकडून सात स्टॉल लावण्यात आले आहेत.तसेच या ठिकाणी नागरिकांना कोविड लसीकरण,कोविड चाचणी, रक्तदान शिबीर,दिव्यांग प्रमाणपत्र व साहित्य वाटप, डोळयांची तपासणी व चष्मे वाटप, असंसर्गजन्य रोग तपासणी व सल्ला, मानसिक आरोग्य व सल्ला, दंत आरोग्य,मौखिक आरोग्य,तंबाखुजन्य पदार्थ दुष्परिणाम सल्ला, कर्करोग माहिती, एकत्रित प्रधानमंत्री व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना माहिती इत्यादी विविध योजनांची महिती व प्रत्यक्ष लाभ शिबीरात दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . सुरेश साबळे यांनी दिली.
या महाशिबीरास प्रमुख अतिथी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय यु.ललित, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए.ए.सय्यद, न्यायाधीश एस.एस. शिंदे, न्यायाधीश श्रीमती व्हि.व्हि.कांकणवाडी यांच्यासह नॅशनल लिगल सर्विसेसचे सदस्य सचिव अशोक जैन,डी.पी.सुराणा,औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर बीड मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत एस.महाजन या मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीडचे सदस्य सचिव एस.एन. गोडबोले हे या महाशिबीराचे आयोजक आहेत. शिबीरास गरजू व पात्र नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करुन सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी केले आहे.
Leave a comment