भव्य बालाजी मंदिर पूर्णत्वास
माजलगाव तालुक्यास मोठी धार्मिक परंपरा आहे. केसापुरी चे केशवराज,पुरूषोत्तमपुरीचे पुरुषोत्तमचे मंदिर,दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे मंजरथ सोबतच शुक्लतीर्थ येथील हेमाडपंथी मंदिर मोगऱ्याचे नृसिंह मंदिर ,गंगामसाला येथील प्रसिद्ध मोरेश्वर गणपती तसेच शहरातील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर,दक्षिणमुखी मारोती हे माजलगावच्या धार्मिक वैभवात भर टाकतात.शहरात एक भव्य असे बालाजी मंदिर असावी हे शहरातील बालाजी भक्तांची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती ती इच्छा 20 ऑक्टोबर रोजी ही पूर्णत्वास जात आहे.
तालुक्यातील हजारो बालाजी भक्तांच्या इछशक्तीला शहरातील राजस्थानी समाजाने आपल्या दातृत्वाने आणि कर्तृत्वाने मूर्त रूप दिले आहे.त्यास शहरातील सर्वधर्मीय राजकीय नेतृत्वाची खंबीर आणि मोलाची साथ लाभली.मागील 5 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर नगरपालिकेच्या 4700 स्क्वे फूट भूखंडावर हे भव्य मंदिर हजारो दात्या कडून आलेल्या देणगीवर उभे राहिले आहे.यासाठी राजस्थानी सतसंग सेवा मंडळचे अध्यक्ष शिवप्रसाद भुतडा यांनी तन-मन-धनाने परिश्रम घेतले.मंदिरासाठी लागणारा निधी देणगीदारा कडून येण्यापूर्वी गरज पडेल तेव्हा भुतडा यांनी स्वतः मंदिर उभारणीसाठी पैसा खर्च केला आहे हे विशेष.त्यांना राजस्थानी समाजासोबत तमाम हिंदू बांधवांची तेवढीच मोलाची साथ मिळाली.यासाठी नगरसेवक राजश्री मुंदडा यांनीही आपली राजकीय शक्ती वापरत वेळप्रसंगी साथ दिली.
18,19 व 20 ऑक्टोबर रोजी पार पडणाऱ्या या बालाजी भगवान प्रतिष्ठा सोहळ्यासाठी तमाम बालाजी भक्तांसोबत राजस्थानी समाजातील आबालवृद्ध मागील महिनाभरापासून परिश्रम घेत आहेत.या करिता माहेश्वरी सभेतील जेष्ठ मार्गदर्शक गोविंद बजाज,जगदीश चांडक,जुगलकिशोर नांवदर,जुगलकिशोर भुतडा,नंदकिशोर भुतडा,डॉ संजय जेथलिया,लक्ष्मीकांत मानधने यांनी माहेश्वरी सभेचे तालुकाध्यक्ष विनोद जाजू तालुका सचिव उमेश जेथलिया,जिल्हा संघटन मंत्री डॉ कमलकिशोर लडा यांच्याशी विचारविनिमय करून विविध समित्यांची रचना केली.
समित्या बनवताना सर्वधर्मीय लोकांना सामावून घेण्यात आले.संरक्षक समिती बनवताना शहरापासून जिल्ह्यापर्यंत सर्व पक्षीय नेतृत्वाना सामील करून घेण्यात आले.यात नगराध्यक्ष पासून आमदार, पालकमंत्री,खासदार यांना सामावून घेण्यात आले.राजस्थानी सतसंग सेवा मंडळाचे पदाधिकारी,वर्धमान श्रावक संघ,माहेश्वरी सभा,जैन संघटना,विप्र संघटना आणि गजानन नगरचे रहिवाशी या विविध समितीत उत्साहाने सहभागी झाले.जेवढया उत्साहात सहभागी झाले तेवढ्याच उत्साहात आज बालाजी भगवान प्राणप्रतिष्ठा कार्य पार पाडत आहेत.
समिती बनवताना स्वागत समिती बनवली गेली यात डॉ आर जी बजाज,रामेश्वर टावणी,राधेश्याम लोहिया,गोविंद करवा,संतोष जेथलिया राधेश्याम जेथलिया,संतोष बजाज ,विनोद बजाज यांचे सामाजिक कार्य समोर ठेवून यांना स्वागताची महत्वाची जबाबदारी दिली गेली
समाजातील जेष्ठ नागरिकांची आशीर्वाद समिती बनवली यात रामनिवसजी मुंदडा,भिकचनजी दगड,गोपिकीशनजी इंदानी, ऍड रामसुखजि जेथलिया,ओमप्रकाश मालपाणी यांच्या अनुभवाची शिदोरी आशीर्वाद स्वरूपात सोबत घेतली
,मार्गदर्शक समिती मध्ये रामानंद लड्डा,रमेश कास्ट,रामद्याल मुंदडा,प्रकाशजी मालानी यांचे सामाजिक कार्य मार्गदर्शक रुपात समोर ठेवले गेले
मंदिर उभारताना महत्वपुर्ण असणारी अर्थ समिती बालप्रसाद भुतडा,रमेश बाहेती,नवल काबरा,प्रदीप भुतडा,ऍड दीपक बजाज सह इतरांना स्थान दिले तर प्रचार समिती जुगलकिशोर झंवर,पुरुषोत्तम करवा,हरीश यादव,आकाश बियाणी,गणेश लोहिया,रत्नकर कुलथे कमलेश जाबर्स यांच्याकडे सोपवली गेली. पूजा समिती रंकिशोर लड्डा,विपीन नांवदर,रामानंद झंवर,बालप्रसाद करवा,महेश मुंदडा,विवेक बजाज यांनी संभाळली.शोभा यात्रा समितीची जबाबदारी विकास भुतडा,राजेश गिल्ड,कैलास सारडा,शिरीष नांवदर,तुशार भुतडा,रवी मानधने,प्रदीप रेदासनी,संकेत दुगड,रोहित नांवदर,अमर बजाज,कैलास मानधने,राम भुतडा,नितीन मालानी यांनी सांभाळली तर महाप्रसाद समिती ची जबाबदारी कल्याण गुजकर,राजेश देशपांडे,सुनील मालाणी,श्रीकिसनजी कालिया,राजू मुंदडा,एकनाथ जाधव,बाळू मालपाणी,सुरेश वटमवर आदींनी संभाळली सोबतच कोव्हिडं लसीकरण व रक्तादान शिबिर घेण्यासाठी आरोग्य समिती बनवून डॉ प्रकाश आनंद गावकर,डॉ सुरेश साबळे,डॉ यशवन्त राजेभोसले,डॉ श्रेयस देशपांडे डॉ संदीप मुंदडा,डॉ नितीन जेथलिया,डॉ आनंद लोढा डॉ महेश मालपाणी यांनी ही जबाबदारी घेतली.सोबतच महिलांच्या वेगवेगळ्या समित्या बनवल्या गेल्या.
या तीन दिवसीय सोहळ्यात युवकांची दुचाकी फेरी व वृक्षारोपण 17 रोजी संपन्न झाले.18 रोजी शोभायात्रा संपन्न होऊन विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला तर 19 रोजी रक्तदान शिबिर व भजन संध्या हा अतिशय सुरेल भजनाचा कार्यक्रम होणार आहे.18,19 20 या 3 दिवसात कोव्हिडं चे लसीकरण होणार आहे.शेवटच्या दिवशी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होऊन महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे.या महाप्रसादचे यजमान नितीन मुंदडा,विशाल भोसले,राहुल लंगडे,मच्छिंद्रकाळे हे आहेत.
एकूणच माजलगावच्या वैभवात या मंदिरामुळे भर पडणार आहे.बालाजीचे हजारो भक्त दरवर्षी माजलगाव हुन तिरुपतीला दर्शनाला जातात.या हजारो भक्तांची भक्तीची भूकच काहीं अंशी मिटणार आहे.शहरात बालाजी मंदिराची असणारी कमतरताही पूर्णत्वास गेली आहे.तमाम हिंदु धर्मीय बालाजी भक्तांसाठी ही गौरवाची गोष्ट असणार आहे.
उमेशकुमार जेथलिया
तालुका सचिव माहेश्वरी सभा,माजलगाव
9404022648
Leave a comment