बीड । वार्ताहर
यंदा जिल्ह्यात अतिृष्टीने खरीपाचे अतोनात नुकसान झाले. 666.मि.मी वार्षिक पर्जन्यमान असलेल्या बीड जिल्ह्यात तब्बल 933 मि.मी.पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील 7 लाख 72 हजार 286 हे.पैकी 5 लाख 24 हजार 212 क्षेत्र हेक्टर बाधीत झाले आहे. या सर्व क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण होत आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात जून ते सप्टेबर या कालावधीत मोठी जीवितहाणी झाली असून वीज पडून चौघांचा तर पुरात वाहून गेल्याने 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त अन्य कारणाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच 8 जण जखमी झाले आहेत. प्रशासनाकडून मृत्यू झालेल्या 13 जणांच्या वारसांना शासकीय मदत वितरीत केली गेली आहे. अतिवृष्टीने पशुधनालाही हाणी पोहचवली. लहान मोठी ओढकाम करणारी अशी एकुण 233 जणावरे मार्च ते सप्टेबर या कालावधीत मृत्यूमुखी पडली तर 16 सप्टेबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत आणखी 232 जणावराचा मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनाने याची नोंद घेतली आहे. या सार्या नुकसानीबरोबरच जिल्ह्यात जून, ऑगस्ट, सप्टेबर या तीन महिन्यात 1826 घरांची पडझड झाली. 298 झोपड्या नष्ट झाल्या. 10 ठिकाणच्या गोठ्यांच्याही नुकसान झाले आहे. सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले असून प्रशासनाकडून आता यासाठीच्या अनुदान मागणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रेकर यांचा आजचा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
Leave a comment