22 मार्च 2020 भारता मध्ये काही कालावधी साठी संपूर्ण देशात लॉकडाउन लागू करण्यात आले. परिस्थिति नियंत्रणामध्ये येइल असे वाटत असतानांच ती पूर्णपणे हाताबाहेर गेली. भारतासारख्या  भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने विशाल आशा देशात वैद्यकीय सुविधा ची कमतरता आणि कोरोना विषाणू अर्थात कोविड-19 चे संकट संपूर्ण देशात थैमान घालत असतांना, प्रत्येकाच्या मनामध्ये, सर्व स्तरामध्ये एक भिती, अनिश्चितता आणि प्रत्येक जीव वाचवण्यासाठी प्रथम प्राधान्य त्यातून चाललेली धडपड अशातच पहीली लाट संपली .पूर्ण नायनाट झाला नाही पण थोडासा सुस्कारा आणि मिळाला तो खंडीत लॉकडाउन काही प्रमाणात वैद्यकीय सुविधांची मोठया स्तरावर उभारणी झाली आणि आपण कोरोनाला हरवू शकतो असे वाटायला लागले. पण त्याचवेळी कोरोनाची दुसरी लाट आली थोडी भयानकच अनेकाची जवळची व्यक्ती त्या लाटेत हरवली , कायमची दूर गेली. त्यात आणखी कोरोनाचे वेगवेगळे व्हेरीयंट आणि आणखी भितीचे रुप गडद व्हायला लागले. शास्त्रज्ञ आणि वैद्यकिय क्षेत्रातील देवदूतांनी त्यावर लसीचा उपाय शोधला . जागरण आणि मार्गदर्शन मोहीम सुरू झाल्या.

एकीकडे अख्खे जगच थांबलेले, भांबावलेले आणि अनिश्चततेच्या सावटाखाली आलेले.पूर्ण अर्थचक्र पण थांबलेले. थोडया फार फरकांनी ते सुरळीत करण्याचा प्रयत्न चालू आहेतच पण सर्वांचे संपूर्ण लक्ष आणि संपूर्ण व्यवधान दिले त्या वैद्यकीय पायाभूत सुविधा ते अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात. त्यावेळी ते अत्यंत गरजेचे पण होते. परंतु सर्व क्षेत्राला उभारी देणारे , मन आणि शारीर याची जडण घडण करणारे व सर्वच उपक्षेत्राची दिशा ठरवणारे असे शिक्षण क्षेत्र मात्र थबकलेलेच , थांबलेलेच यावर ठोस उपाय व्हावेत अशी चर्चा झालीही आणि जणूकाही जादूची कांडी आणून दिली तसे सुरू झाले ऑनलाइन शिक्षण. अर्थात अभासी शाळा. सुरवातीला हे बर, ठिक वाटत होत पण त्यातूनच पुढे आला तो शिक्षणातील अनिश्चततेचा काळ .अनेक प्रयोग आणि शैक्षणिक क्षेत्रातील कारखनदारीमध्ये वेगवेगळ्या संस्थांनी सुरू केलेले एजू केशनल अॅप्स. आणि या सगळयांचा लाभार्थी व्हायचे असेल तर आवश्यक असणारे वेगवेगळे डिव्हायसेस ( उपकरणे ) . आमचेच नेटवर्क स्ट्राँग अश्या अनेक बाजार मांडणाऱ्या कंपन्या. वेगवेगळ्या व्यापारी शैक्षणिक संस्थेनी विकसित केलेले पेडअॅप्स.एकीकडे अर्थचक्राची भयावह स्थिती घरातच बसून राहावे लागण्याचा कालावधी . घरातच जेल सारखे राहावे लागल्यामुळे होणारी घुसमट. फक्त त्यात सकारात्मक काय तर कुटंब म्हणून एकत्र राहाता येत होत पण त्यानंतर येथेही सुरू झाले ते हरवलेला प्रत्यक्ष संवाद आणि बदलेली संपर्काची साधने.
 

शिक्षण देणारे आणि घेणारे यांच्या  मधील हळूहळू हरपत चाललेले पवित्र नाते व संवाद

कनिष्ठ उत्पन्न गटातील पालकांनी आपला पाल्य शिक्षण प्रक्रीयेत टिकावा यासाठी केलीली केवल वाणी धडपण या शासकीय यंत्रणेला कधी दिसतच नव्हती का ?
मध्यम उत्पन्न गटातील पालकांचीही होणारी व्दिधा मनस्थिती त्यातून ऑनलाईन तासिकांचे वेळापत्रक संभाळतांना व एका पेक्षा जास्त पाल्यांना मोबाइल किंवा लर्निंग डिव्हासेस उपलब्ध करून देतांना होणारी परवड खरचच दुर्लक्षित होत नाही का ?
आणि मग त्यातून अनेक पालकांनी ठरवलेला त्यांच्या पाल्याच्या शिक्षणातील आग्रक्रम. जावू दे ना ! एखादे वर्ष थांबू, नाही तरी परीक्षा कुठ होत आहे ? तुला तर तसही पुढच्या वर्गात पाठवणारच आहेत . आणि या दोन वर्षातील शिक्षणांची शोकांतिका ती म्हणजे शिक्षण हे साधन केंद्रीत झाले. श्रीमंत पैसेवाल्या पालकांकडे ही शिक्षणाची साधनांची विपूल उपलब्धता होत आहे. तर गरीब, कष्टकरी, शेतकरी, मध्यमवर्गीय पालक आणि पाल्य यांच्यासाठी नवीन तंत्राच्या साहयाने सुरू झालेल्या ऑनलाईन शाळेचे प्रवेश द्वारच बंद ते वाट पहातायत त्या पारंपारीक शाळेची दार उघडण्याची आणि गुखजींचा तो प्रत्यक्ष अवाज ऐकण्याची ही प्रतिक्षा संपणार का ? का त्या बालकांना शिक्षणाच्या प्रतिक्षेतच ठेवणार ?
शिक्षण हे केवळ परीक्षेसाठी नाही. अनेक कौशल्ये विकसित व्हावीत , अनेक क्षमता वृद्धींगत व्हाव्यात , चौफेर विकास करता यावा, व्यक्तिमत्व विकसन होतांना शारीरिक, बौद्धिक, मानसिक जडण घडण होत असते ना .बौध्दीक आणि भावनिक गुणांक वाढतो ना. स्वतः सोबतच राष्ट्राचा , देशाचा विकास होतो ना. मग ही शिक्षणाची विविध उद्दीष्टे ऑनलाइन शिक्षण प्रक्रीयेत साध्य होत आहेत का ?
आत्मविश्वास, सहकार्य, co-learning, mutual & equal understanding या गोष्टीची रुजवणूक आणि विकास होतो का ? सहअध्ययन , नवीन जाणीव जागृती , सजृनशीलतेची निर्मिती या Online learning प्रक्रीयेतून होते का ?
शिक्षणाचे मूळ ध्येय वाचन , लेखन , मनन , चिंतन, संभाषण व अकलन हे ह्या प्रक्रियेतून होत का ? विज्ञान आणि गणिताचा तासिकेतून होणारी तार्किक चर्चा , अनेक यक्ष प्रश्नांची उकल आणि गणितीय व वैज्ञानिक दृष्टि online learning मधून मिळते का ?
ज्यांच्या अनुकरणातून आणि सहवासातातून बालकांचे भावविश्व घडते ,उभारते आणि उभारी घेते त्या गुरुजींचा आणि बाईंचा सहवास online learning मधून कुठे व कसा मिळणार ?संस्कृती संवर्धन , अनेक मूल्यांची सहज रूजवणूक होते ती शाळा व महाविद्यालय ओसच पडणार का ?ज्या परीसरातून परीस स्पर्श प्राप्त होतांनाच , शिष्टाचार , संयमन, मनावर अनेक माध्यमातून संस्कार होतात , प्रार्थना, गीतांचे पठण ह्याची शिकवणूक कशी होणार. संवेदना, सहनशीलता ,सह वेदना याचे शिक्षण Online प्रक्रीयेतून कसे झिरपवता येईल ?
शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारी आणि निर्णय प्रक्रीयेत सहभाग घेणाऱ्या नेतृत्वांना हे सर्व प्रश्न पडत नाहीत का ? ७३० दिवसांचा कालावधी संपत आहे तरीही आरोग्याइतकच शिक्षणाच्या धोरणाला मूल्य का दिल जात नाही. ही उदासिनता आणि त्याची कोंडी फुटणार कधी ?बर नुसतेच  नेहमी सर्वेक्षण केले जातात आणि शासकीय अॅप्स पण विकसित केले जातात पण त्याची अंमलबजावणी होत नाही . वंचिताच्या दारात आणि घरात शोधगंगा, संयम, दिक्षा पोहचत नाही ना वाहत नाही हे कटू सत्य आहे. प्रत्यक्ष किती विद्यार्थी ह्या सर्व 0nline learning प्रक्रीयचे लाभार्थी आहेत त्यातून त्यांचे किती कौशल्ये, क्षमता विकसित झाल्या ह्याचा कोणताही ठोस डाटा उपलब्ध नाही. ज्या उच्चभ्रू विद्यार्थी व पालकांकडे साधनांची रेलचेल आहे तेही या सर्व अभासी , तांत्रिक आणि रटाळ प्रक्रीयेला कंटाळले आहेत.
इंटरनेटचा वापर करतांना अनेक अनावश्यक आणि ज्याला स्पर्श सुध्दा होवू नये अश्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या समोर येत आहेत. त्यावर कोणत्याही यंत्रणेचे नियंत्रण नाही . मग ही पिढी कोणत्या आणि कुठच्या दिशेने , मार्गाने जाणार ?कोणता प्रवाह निर्माण करणार ?. या online learning अधिकृत व जागतिक स्तरावरील मानांकित संस्थेचे सर्वेक्षण सांगते आहे अनेक जण लहान बालकांपासून ते तरुणा पर्यंत एकलकोंडे होत आहेत , मानसिक आजारांनी ग्रासले आहेत , चिडचिड आणि पटकन राग येणे होत आहे .आत्मविश्वासाचा अभाव आहे . प्रांगणे, क्रिडागंणे या वरचा बहरच ओसराला  आहे शारीरीक व्याधी तर चिकटतच आहेत त्यात मानसिक स्वास्थ सुध्दा हरवत आहे .
online learning प्रक्रीयेतून खरच शिकत आहेत का ? जर विद्यार्थी शिकत असतील तर त्याचे मूल्यमापन तंत्र कोणते विकसित केले ?. केवळ पुढच्या वर्गात , इयत्तेत ढकलण्यासाठीच टक्केवारीचे सूत्र तयार करतांना कोणते मूल्य प्राप्त झाले ?का मूल्याशिवाय शिक्षण होणार आणि यातून अध्ययन- अध्यापन प्रक्रीयेवरच घाला घातल्या जातो आहे. हे सर्व कोलमडून पडतांना हे दुष्टचक्र थांबणार नाही का ?
प्रचंड गर्दीने ओसांडून वाहणाऱ्या बाजारात , मार्केटमध्ये  लहान बालकांना घेवून जातांना कोणालाच सोयरसुतक नाही. पण त्याच बालकांना शाळेत पाठवायच तर प्रश्नांचा भडीमार आणि संकटाची शृंखला उभी केली जाते हे खरे नाही का ? 
Learn from Home - मधून लहानग्याचा वाढलेला.screen time त्यातून निर्माण होणाऱ्या व्याधी त्याचा दिर्घ काळ किंवा अनेक वर्षे परिणाम होणार त्याचे मोजमाप कोण करणार ? या सर्वांचे उत्तरदायित्व कोण घेणार ? कुठतरी हे थांबले पाहीजे नाही का ?रचनात्मक बांधणी करून मार्ग काढले पाहीजे. लसीकरण, प्रतिजैवेके, रोगप्रतिकारक शक्ती , बलसंवर्धन हे वाढवत नेले पाहीजे आणि शाळेचे दार खुल झाले पाहीजेत . शाळेची घंटेचा अवाज आणि शाळेकडे येणारे पावले आता शाळेकडे आनंदानी येवून परत किलबिलाट व लहानग्याचा चिवचिवाट होतांना नाविन्याची कास धरणारी आणि अगामी धोरण ठरवणारी पिढी बाहेर यायलाच हवी .....
 
......लेखक......
शैलेंद्र रत्नाकरराव कंगळे
सहशिक्षक , खोलेश्वर माध्यमिक विद्यालय, अंबाजोगाई,

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.